esakal | युवतीवर बलात्कार; माणचे दोघे अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

युवतीवर बलात्कार; माणचे दोघे अटकेत

सागर हा मोबाईल बंद करून फरारी झाला होता. पुणे रेल्वे स्टेशनवर तो असल्याची माहिती मिळाली. पुणे रेल्वेचे पोलिस उपनिरीक्षक रवी गोडसे यांच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित यांच्या पथकाने सागरला ताब्यात घेतले.

युवतीवर बलात्कार; माणचे दोघे अटकेत

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : खोट्या नावाने चॅटिंग करून झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत पालकांना मारण्याची धमकी देत युवतीवर बलात्कार करणाऱ्या तसेच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणारा मित्र अशा दोन संशयितांना शिताफीने अटक करण्यात आली. दहिवडी पोलिसांनी हा गुन्हा 24 तासांतच उघडकीस आणला. सागर ऊर्फ श्रीकृष्ण अर्जुन अवघडे (रा. डंगिरेवाडी, ता. माण) व पप्पू ऊर्फ अमोल विलास खरात (रा. दहिवडी, ता. माण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण घेत असलेल्या पीडित युवतीशी सागर हा सूरज दत्तात्रय नाळे (रा. बारामती) या खोट्या नावाने व्हॉट्‌सऍपवर चॅटिंग करत होता. "मला भेटायला ये, अन्यथा तुझ्या आई-वडिलांचे बरे-वाईट करीन,' अशी धमकी देऊन त्याने पीडितेला मोगराळे घाटावर भेटायला बोलावले. भीतीपोटी ही पीडिता 12 ऑक्‍टोबरला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सागरला भेटायला गेली. गोड बोलून सागरने राजवडी (ता. माण) हद्दीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी सागरचा मित्र अमोलने मोबाईलवर अश्‍लिल फोटो काढले, तसेच पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल झाला. परंतु, हा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असल्याने तो दहिवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

बेगमपूर-माचणूर भीमा नदीवरील पुलाची बाजू खचल्यामुळे स्थिती धोकादायक
 
पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख हे तपास करत होते. गुन्ह्यात वापरलेले मोबाईल बंद केले असल्याने संशयित निष्पन्न करणे अवघड व गुंतागुंतीचे होते. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली तपासपथके तयार करण्यात आली. संशयितांच्या वर्णनावरून, खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून तसेच संशयितांच्या गुन्ह्याच्या पूर्वइतिहासावरून पप्पू ऊर्फ अमोल यास ताब्यात घेण्यात आले. झडतीत त्याच्याकडे सापडलेल्या मोबाईलमध्ये पीडितेने सांगितल्यानुसार आक्षेपार्ह फोटो आढळले. चौकशीत अमोलने सागरने बलात्कार केल्याचे सांगितले.

गुन्हेगारी माेडीत काढणे हेच माझे ध्येय : आंचल दलाल

सागर हा मोबाईल बंद करून फरारी झाला होता. पुणे रेल्वे स्टेशनवर तो असल्याची माहिती मिळाली. पुणे रेल्वेचे पोलिस उपनिरीक्षक रवी गोडसे यांच्या माध्यमातून पोलिस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित यांच्या पथकाने सागरला ताब्यात घेतले. या पथकात राजकुमार भुजबळ, प्रमोद दीक्षित, सहायक फौजदार देवानंद तुपे, पोलिस नाईक सुहास खाडे व रवी बनसोडे, पोलिस शिपाई योगेश बागल, केतन बर्गे व कुचेकर यांचा समावेश होता. फलटणचे सहायक पोलिस निरीक्षक संजय बोंबले यांनीही तपासकामी सहकार्य केले.

Edited By : Siddharth Latkar