

Shocking Crime in Mahabaleshwar: Pune Visitor Dies After Brutal Attack Outside Hotel
sakal
पाचगणी : महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील भोसे गावात भिगवण (जि. पुणे) येथून पर्यटनासाठी आलेल्या २५ वर्षीय पर्यटकास स्थानिक चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत, सर्व संशयितांना ताब्यात घेतले आहे. अक्षय रमेश जाधव (रा. भिगवण, ता. इंदापूर) असे मृत पर्यटकाचे नाव असून, आपल्या घराच्या दिशेने डोकावल्याचा संशय आल्याच्या कारणावरून ही घटना घडली.