esakal | लोणंद-नीरा मार्गावर स्कार्फ चाकात अडकून पुण्यातील महिला ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

सत्वशीला यांचा गळ्यातील स्कार्प मोटारसायकलच्या पाठीमागील चाकात अडकला.

लोणंद-नीरा मार्गावर स्कार्फ चाकात अडकून पुण्यातील महिला ठार

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (सातारा) : लोणंद-नीरा रस्त्यावर (Lonand-Nira Road) बाळुपाटलाचीवाडीच्या (ता. खंडाळा) हद्दीत आस्वाद हॉटेलसमोर मोटारसायकलच्या मागील चाकात गळ्यातील स्कार्प अडकून महिला जागीच ठार झाली. गुरुवारी (ता. २) रात्री पावणेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

सत्वशीला रामदास घोलप (वय ५५, रा. खडकी बाजार, पुणे) असे मृताचे नाव आहे. लोणंद येथील बिरोबावस्तीवरील ओंकार भिसे व सत्वशीला हे खडकी बाजार, पुणे येथून मोटारसायकलने लोणंदकडे येत होते. सत्वशीला यांचा गळ्यातील स्कार्प मोटारसायकलच्या पाठीमागील चाकात अडकला. त्यामध्ये रस्त्यावर पडल्याने गळ्यास व डोक्यास मार बसून त्या जागीच ठार झाल्या. याबाबत अलंकार शेलार यांनी फिर्याद दिली असून लोणंदचे हवालदार श्री. पवार तपास करत आहेत.

हेही वाचा: बाल गणेशाने इथेच मारला सिंदुरासुरास

loading image
go to top