

Lakhs Join Historic Sevagiri Rath Yatra, Pusegaon Resonates with Devotion
Sakal
पुसेगाव : येथील श्री सेवागिरी महाराजांचा ७८ वा रथोत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात व उदंड उत्साहात झाला. आमदार महेश शिंदे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मनोज घोरपडे, मठाधिपती महंत सुंदरगिरी महाराज आणि मान्यवरांच्या हस्ते सकाळी साडेनऊ वाजता श्री सेवागिरी महाराजांच्या रथाचे पूजन करण्यात आले. रथमार्गावरून तब्बल १२ तास श्री सेवागिरी महाराजांच्या रथाची मिरवणूक सुरू होती.