
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील शेतकरी व रोजगाराच्या संधी शोधणारा युवकवर्ग या प्रदर्शनात आवर्जून हजेरी लावताना दिसत आहे.