

Pusegaon Road Accident News Two Killed in ST Bus and Bike Collision Near Shindewadi Triggering Village Protest
sakal
पुसेगाव : सातारा- लातूर राष्ट्रीय म्हामार्गावरील पुसेगावनजीक शिंदेवाडी येथे एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातात दोन जण ठार झाले. राजाराम सुखदेव सावंत (वय ८५, रा. निढळ) आणि किरण दिलीप घाडगे (वय ३१, रा. खटाव) अशी अपघातात ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, या ठिकाणी वारंवार अपघात होत असून, उपाययोजना केल्या जात नसल्याबद्दल ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.