esakal | 25 विद्यार्थी कोरोनाबाधित; बाजारपेठ राहणार पाच दिवस बंद

बोलून बातमी शोधा

25 विद्यार्थी कोरोनाबाधित; बाजारपेठ राहणार पाच दिवस बंद}

या बैठकीत कोरोनाने उद्‌भवलेल्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जास्तीतजास्त संशयितांच्या, तसेच व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

25 विद्यार्थी कोरोनाबाधित; बाजारपेठ राहणार पाच दिवस बंद
sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : पुसेगावसह परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने दक्षता म्हणून प्रशासनाने पुसेगाव कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केले आले आहे. त्यामुळे रविवार पर्यंत (ता. 28) मुख्य बाजारपेठ बंद राहणार आहे. येथे कोरोना संसर्ग वाढल्याने प्रशासन चिंतेत असून, वेगाने होणारा फैलाव रोखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.
 
श्री सेवागिरी विद्यालयात 25 विद्यार्थी बाधित आढळले आहेत. सध्या पुसेगावसह परिसरात 28 रुग्ण ऍक्‍टिव्ह आहेत. परिस्थितीचे गांभीर्य पाहून प्रभारी प्रांताधिकारी जनार्धन कासार यांच्या उपस्थितीत सेवागिरी मंदिरात आढावा बुधवारी बैठक झाली. या बैठकीस सहायक पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, मंडलाधिकारी तोरडमल, तलाठी गणेश बोबडे, वैद्यकीय अधिकारी आदित्य गुजर, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुरेशशेठ जाधव, ग्रामपंचायत सदस्य, अंकुश पाटील, राम जाधव, सुश्रुत जाधव ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.

संभाव्य धोका टाळण्यासाठी पुढील सात दिवस शाळेला दिली सुटी

बैठकीत ग्रामस्थ, ग्रामपंचायत व प्रशासनाने एकत्र येत गावाच्या हितासाठी बाजारपेठ पाच दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या बैठकीत कोरोनाने उद्‌भवलेल्या गंभीर परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. जास्तीतजास्त संशयितांच्या, तसेच व्यापाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला. रुग्णांची संख्या पाहता संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात यावे, असे एकमताने ठरविण्यात आले. त्यानुसार पुढील पाच दिवसांसाठी कंटेनमेंट झोनमधील सर्व प्रतिबंध गावांत लागू करण्यात आले आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा प्रभारी प्रांताधिकारी कासार यांनी दिला. 

पुसेगावसह परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. दक्षतेचा उपाय म्हणून व्यापाऱ्यांनी आरोग्य केंद्रात कोविड तपासणी करून घ्यावी. 

- आदित्य गुजर, वैद्यकीय अधिकारी, पुसेगाव 


धक्कादायक! पहिल्या बायकोस टीव्ही आणण्यास नेल्याने दूसरीने दिला जीव 

Thank You Doctor : बाळाचा बोटीत जन्म; ग्रामस्थांत आनंदाश्रू

कऱ्हाडकरांना मिळणार दिलासा? पालिकेची आज अर्थसंकल्पीय बैठक

तुमच्याकडून मला हे गिफ्ट हवयं : उदयनराजे

साताऱ्यात फॉरेनर्सचा जिल्हा कारागृहात धुमाकूळ; विवस्त्र होऊन केली सीसीटीव्ही व टॉयलेटची तोडफोड

Edited By : Siddharth Latkar