पुसेसावळी दंगली प्रकरणात विक्रम पावसकरांना अडकवण्याचं षडयंत्र; हिंदुत्ववादी संघटनांचा जशास तसं उत्तर देण्याचा इशारा

विक्रम पावसकर यांचे नाव दंगलीशी विनाकारण जोडले जात आहे.
Pusesawali Riots Vikram Pavaskar
Pusesawali Riots Vikram Pavaskaresakal
Summary

दंगलीशी काहीही संबंध नसताना निराधारपणे विक्रम पावसकर यांना त्या प्रकरणात गोवण्याचे उद्योग बंद करावेत.

कऱ्हाड : पुसेसावळीच्या दंगलीशी (Pusesawali Riots) विक्रम पावसकर (Vikram Pavaskar) यांचा काडीमात्र संबंध नसताना त्यांना विनाकारण त्यात अडकविण्याचे षडयंत्र होत आहे. ते त्वरित थांबवावे, अन्यथा जशाच तसे उत्तर दिले जाईल, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांच्या (Hindu Association) प्रतिनिधींनी झालेल्या बैठकीत व्यक्त केली.

Pusesawali Riots Vikram Pavaskar
Pusesawali Riots : पुसेसावळीत मोठी दंगल; विक्रम पावसकरांच्या अटकेसाठी अल्पसंख्याक बांधव रस्त्यावर, भाजप नेत्यावर काय आहे आरोप?

बैठकीस हिंदू एकता, विश्व हिंदू परिषद, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आदींसह वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते. ज्येष्ठ माजी नगरसेवक विनायक पावसकर यांनी बैठकीची माहिती दिली.

Pusesawali Riots Vikram Pavaskar
Pusesawali Riots : उसळलेल्या दंगलीनंतर पुसेसावळीत काय आहे स्थिती? मोठा पोलिस बंदोबस्त तैनात, शाळा-बाजारपेठ पूर्णपणे बंद

ते म्हणाले, ‘‘विक्रम पावसकर यांचे नाव दंगलीशी विनाकारण जोडले जात आहे. त्यांचा आरोप निराधार आहे. वादग्रस्त पोस्टबाबतची तक्रार देण्यासाठी विक्रम पावसकर तेथे गेले होते. त्यानंतर ते तिकडे फिरकलेले नाहीत, तरीही विनाकारण विक्रम यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. त्यामागे मोठे षडयंत्र सुरू आहे.

विक्रमचे नाव यावे, यासाठी प्रयत्न करणारी प्रवृत्ती घातक आहे. त्यांनी आतापर्यंत जातिवाद पोसण्याचे काम केले आहे. गायींची अवैध वाहतुकीच्या प्रकरणातही ते वारंवार आडवे येत आहेत. त्याशिवाय अन्य प्रकरणातही त्यांनी एकतर्फी प्रयत्न केले आहेत. त्या सगळ्याचे पुरावे आम्ही मिळवले आहेत.’’

Pusesawali Riots Vikram Pavaskar
Maratha Reservation : मराठा समाजाचे चक्री उपोषण तात्पुरते स्थगित; काय आहे कारण, असा का घेतला निर्णय?

त्याबाबत प्रशासनाला रीतसर निवेदन देणार आहोत. विक्रम पावसकर यांच्यावर होणारे आरोप निराधार आहेत. त्यांची मागणीही चुकीचीच आहे. पुसेसावळीच्या प्रकरणात शासकीय रुग्णालयाबाहेर निर्माण झालेली स्थिती कशाचे द्योतक आहे. याचाही विचार होण्याची गरज आहे.

Pusesawali Riots Vikram Pavaskar
Maratha Reservation : PM मोदीच मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात, कारण..; शाहू छत्रपती महाराजांचं मोठं विधान

त्यामुळे दंगलीशी काहीही संबंध नसताना निराधारपणे विक्रम पावसकर यांना त्या प्रकरणात गोवण्याचे उद्योग बंद करावेत, अशी आमची मागणी आहे, अन्यथा त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल. केवळ द्वेषातून विक्रम यांचे नाव गोवण्याचा होणारा प्रयत्न असून, त्याबाबतची सविस्तर भूमिका आज मांडणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com