esakal | शेतजमिनीवरून काशीळात हाणामारी; बोरगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा
sakal

बोलून बातमी शोधा

Kashil

काशीळात शेतजमिनीच्या कारणावरून जोरदार मारामारी झाली. यामध्ये दोघे जण जखमी झाले.

शेतजमिनीवरून काशीळात हाणामारी; बोरगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा

sakal_logo
By
विकास जाधव

काशीळ (सातारा) : येथे शेतजमिनीच्या (Farm Land) कारणावरून काल जोरदार मारामारी झाली. यामध्ये दोघे जण जखमी झाले. बोरगाव पोलिस ठाण्यात (Borgaon Police Station) याबाबत परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. (Quaral In Two Groups Because Of Farm Land In Kashil Satara Crime News)

याबाबत अभिजित जयवंतराव अडनाईक यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, काशीळ येथे आशियाई महामार्गालगत त्यांचे मामा विक्रमसिंह अपराध (कोल्हापूर) यांची 1117/1 व 1118/1 अशी शेतजमीन आहे. त्यापैकी 1118/1 हा संपूर्ण गट मामा विक्रमसिंह अपराध यांनी नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारे त्यांच्या नावे केला आहे. 1117/1 या गटातील तात्या रामू कोळेकर यांची साडेपाच गुंठे जमीन ही खरेदी केली आहे. सोमवारी सकाळी अभिजित अडनाईक हे काशीळ येथील त्यांच्या जमिनीत पाहणी करताना विशाल राजेंद्र भुसावलीया (रा.दीप्ती पेलेस कॉलोनी, न्यू पॅलेस रोड, कोल्हापूर) व गणेश (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी त्यांच्या जमिनीत बेकायदेशीररित्या येऊन "तुझे येथे काही नाही, तू येथे यायचे नाहीस, नाहीतर तुझे हातपाय तोडेन' अशी धमकी देत दोघांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. या वेळी विशाल भुसावलीया याने तेथे पडलेला लोखंडी अँगल घेऊन त्यांच्या डोक्‍यात मारून जखमी केले, असे म्हटले आहे.

विशाल राजेंद्र भुसावलीया यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, काशीळ येथील गट न.1117/1 ही शेतजमीन विक्रमसिंह अपराध यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी व विक्रमसिंह अपराधांची मुलगी स्वाती भुसावलीया यांच्या नावे झाली आहे. या शेतजमिनीसंदर्भात असलेल्या तक्रारीबाबत नागठाणे (ता. सातारा) येथील सर्कल कार्यालयात चौकशी सुरू आहे. सोमवारी सकाळी याच चौकशीकामी ते व चालक गोविंद वराडकर हे कोल्हापूरहून नागठाणे येथे निघाले. वाटेतच त्यांची शेतजमीन असल्याने ते काशीळ येथे 1117/1 शेतजमिनीत गेले. या वेळी तेथे उपस्थित असलेल्या अभिजित जयवंतराव अडनाईक (रा.शिवतेज फार्म, काशीळ, ता.सातारा) याने "तुझा येथे यायचा काय संबंध, तू येथे यायचे नाहीस, असे म्हणत शिवीगाळ करत बाजूला पडलेल्या लोखंडी अँगलने मारण्यास सुरवात केली. यामध्ये विशाल भुसावलीया हे जखमी झाले. दोघांनी बोरगाव पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दिल्या असून, पोलिसांनी विशाल राजेंद्र भुसावलीया, गणेश वराडकर व अभिजित जयवंतराव अडनाईक यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास हवालदार बाबा महाडिक करत आहेत.

माणच्या पंचायत समितीत रासपची बाजी; सभापतिपदी लतिका वीरकरांची निवड

Quaral In Two Groups Because Of Farm Land In Kashil Satara Crime News