esakal | माणच्या पंचायत समितीत रासपची बाजी; सभापतिपदी लतिका वीरकरांची निवड
sakal

बोलून बातमी शोधा

Maan Panchayat Samiti

सभापती कविता जगदाळे (Kavita Jagdale) यांच्यावरील अविश्वास ठराव 12 एप्रिल रोजी आठ विरुद्ध दोन असा मंजूर झाला होता.

माणच्या पंचायत समितीत रासपची बाजी; सभापतिपदी लतिका वीरकरांची निवड

sakal_logo
By
रूपेश कदम

दहिवडी (सातारा) : माण पंचायत समितीच्या (Maan Panchayat Samiti) दहापैकी सर्वपक्षीय आठ सदस्यांनी आपली एकजूट कायम ठेवल्याने सभापतिपदी राष्ट्रीय समाज पक्षाच्या लतिका वीरकर (Latika Virkar) यांची बिनविरोध निवड झाली. (Appointment Of Latika Virkar As Chairperson Of Maan Panchayat Samiti Satara Political News)

सभापती कविता जगदाळे यांच्यावरील अविश्वास ठराव 12 एप्रिल रोजी आठ विरुद्ध दोन असा मंजूर झाला होता. त्यानंतर प्रभारी सभापती म्हणून विद्यमान उपसभापती तानाजी कट्टे हे काम पाहात होते. रिक्त झालेल्या सभापतिपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सभापती निवडीसाठी आज पंचायत समितीत विशेष सभा बोलावली होती. पीठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता सभापतिपदाच्या निवडणुकीचा (Election) कार्यक्रम सुरू झाला.

या सभेसाठी प्रभारी सभापती तानाजी कट्टे, कविता जगदाळे, रमेश पाटोळे, नितीन राजगे, विजयकुमार मगर, तानाजी काटकर, अपर्णा भोसले, लतिका वीरकर, रंजना जगदाळे व चंद्रभागा आटपाडकर हे सदस्य उपस्थित होते. सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असल्याने सर्व प्रवर्गातून निवडून आलेल्या महिलांना संधी होती. सव्वाअकरा वाजता लतिका वीरकर यांनी सभापतिपदासाठी आपला अर्ज गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांच्याकडे दाखल केला. या अर्जावर सूचक म्हणून तानाजी काटकर यांनी स्वाक्षरी केली. दिलेल्या वेळेत वीरकर यांचा एकमेव अर्ज आला. छाननीत अर्ज वैध ठरल्याने दुपारी 12 वाजता वीरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे श्री. सूर्यवंशी यांनी जाहीर केले.

हेही वाचा: 'कृष्णा'च्या निवडणुकीसाठी इच्छुकांना उद्या भरता येणार नाही अर्ज; जाणून घ्या कारण

लतिका वीरकर यांच्या रूपाने प्रथमच पंचायत समितीच्या सभापतिपदी रासपला संधी मिळाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी व रासप युतीने एकत्रित लढली होती. माण पंचायत समितीच्या दहा सदस्यांमध्ये आमदार जयकुमार गोरे गटाचे तीन, शेखर गोरे गटाचे तीन, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन, रासपचा एक व अनिल देसाई गटाचा एक असे बलाबल आहे. मात्र, माजी सभापती कविता जगदाळे व विजयकुमार मगर हे एका बाजूला, तर उर्वरित सर्व आठ सदस्य दुसऱ्या बाजूला असे चित्र होते.

कोकणच्या मदतीला धावले खटावकर; 'महावितरण'कडून सिंधुदुर्गात 24 तास वीज जोडणीचे काम

Appointment Of Latika Virkar As Chairperson Of Maan Panchayat Samiti Satara Political News