राहुल गांधींची भारत तोडो यात्रा ः मंत्री रामदास आठवले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi and PM Narendra Modi

राहुल गांधींची भारत तोडो यात्रा ः मंत्री रामदास आठवले

कऱ्हाड : राहुल गांधीची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. त्यामुळे राहुल गांधींना पक्ष जोडता येत नाही, पक्ष सांभाळता येत नाही ते भारत काय जोडणार आहेत ? कॉंग्रेस पक्षाची अवस्था गलीतगात्र झाली आहे, अशी टिका केंद्रीय मंत्री रामदार आठवले यांनी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर केली.

मंत्री आठवले कऱ्हाड दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोंदीचा सामना करणे हे राहुल गांधींचे काम नाही. नरेंद्र मोदींशी सामाना करणारा देशात दुसरा कोणीही नेता नाही. राहुल गांधीची भारत जोडो यात्रा ही भारत तोडो यात्रा आहे, अशी टीका करुन मंत्री आठवले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळा भारत जोडला आहे. त्यामुळे राहुल गांधींना पक्ष जोडता येत नाही, पक्ष सांभाळता येत नाही ते भारत काय जोडणार आहेत ? कॉंग्रेस पक्षाची अवस्था गलीतगात्र झाली आहे. बिहारचे नितेशकुमार हे मोदींच्या विरोधात विरोधकांनी भेटत आहेत. मात्र ते येऱ्यागबाळ्याचे काम नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढा मोदींनाच फायदा होईल.

Web Title: Rahul Gandhi Prime Minister Narendra Modi Bhārata Jōḍō

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..