esakal | Satara : गोटे येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; 15 जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

crime

गोटे येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा; 15 जणांना अटक

sakal_logo
By
(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी १५ अटक केली. चार लाखांचा मुद्देमाल जप्त आहे. गोटे येथे काल रात्री कारवाई झाली.गोटेच्या श्रीसाई सर्व्हिसिंग सेंटरच्या मागे गुरूवारी झालेल्या कारवाईत अटक झालेल्यांची नावे अशी- प्रविण काटरे (वय ४९, रा. बुधवार पेठ), सादाब सुतार (२४, रा. पार्लेकरनगर), अभिराज वाघमारे (३२, रा. वडोली निळेश्वर), निशांत काटवटे (४२, रा. भोईगल्ली), विनायक मोरे (५२, रा. शुक्रवार पेठ) दिपक पवार (४२, रा. बुधवार पेठ), जावेद मुल्ला (४७, मलकापूर), किशोर जांभळे (५०, रा. सुपने), सुरेश जंबुरे (५६, प्रकाशनगर), विजय ढवळे (४७, रा. बुधवार पेठ), आमनहल्ला तांबोळी (४६, रा. इस्लामपूर), महेश अहीवळे (२६, रा. कालेटेक), गणेश जाधव (५६, रा. दुशेरे), नितीन वाघमारे (२३, रा. कालेटेक), सचिन माने (रा. नांदगाव)

पोलिसांनी सांगितले की, गोटे गावच्या हद्दीत सर्व्हिसिंग सेंटरच्या आडोशाला जुगार अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलीस उपाधिक्षक रणजीत पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारे खातरजमा करुन त्याठिकाणी छापा टाकण्याची सुचना उपाधिक्षक पाटील यांनी विशेष पोलीस पथकाला दिली. त्यानुसार गुरूवारी रात्री उपअधिक्षक कार्यालयातील विशेष पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला.

त्यावेळी जावेद मुल्ला हा जुगाराचा अड्डा चालवित असल्याचे दिसून आले. तसेच इतर चौदाजण त्याठिकाणी जुगार खेळण्यासाठी आले होते. त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडील ४ लाख २२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सागर बर्गे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

loading image
go to top