Satara News: वर्षासरींत आली आनंदवारी! ज्ञानेश्‍वर माउलींचे सातारा जिल्ह्यात आगमन; हजारो वारकऱ्यांच्या जयघोषात भक्तिमय वातावरण

Dnyaneshwar Maharaj Palkhi enters Satara district: ज्ञानेश्‍वर माउलींच्या पालखी आगमनाने सातारा जिल्हा भक्तिरसात न्हाऊन निघाला; वर्षासरींच्या सरी, टाळ-मृदंगांचा गजर आणि ‘माउली... माउली’च्या जयघोषात वारकऱ्यांची अलोट गर्दी
Devotion Meets Monsoon: Dnyaneshwar Maharaj Palkhi Receives Grand Welcome in Satara

Devotion Meets Monsoon: Dnyaneshwar Maharaj Palkhi Receives Grand Welcome in Satara

sakal

Updated on

लोणंद : गजर टाळ- मृदंगांचा, मुखी जयघोष विठू नामाचा आणि अंतरंगी सद्‌भाव माउलींचा जपत, पंढरीकडे निघालेल्‍या संतश्रेष्‍ठ ज्ञानेश्‍वर माउलींच्‍या पालखी सोहळ्याने बुधवारी स्‍वागत कमानीतून जिल्ह्यात प्रवेश करताच हजेरी लावलेल्‍या वर्षासरींनी अलोट गर्दीला आनंदवारीचा अनुभव दिला. दुपारी दोनच्‍या सुमारास पाडेगाव (ता. खंडाळा) येथे जिल्ह्यात आगमन होत असताना, पोलिस बँड पथकाच्या गजरात सशस्त्र मानवंदना देण्‍यात आली. यावेळी पालखी रथावर पावसाचा काही मिनिटे हलका शिडकाव झाला. त्या वेळी उपस्‍थित सर्वांनी आनंदून माउली... माउली असा जयघोष केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com