पावसाचा साता-याला तडाखा! आटपाडी वाहतुक बंद, फलटण-पंढरपूर धिम्या गतीने

टीम सकाळ
Thursday, 15 October 2020

आजही (गुरुवार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कृष्णा नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख धरणातून पाणी साेडण्यात आले आहे. परिणामी जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रात्रीपासून काही भागांतील वाहतुक ठप्प झाली हाेती. आज (गुरुवार) सकाळपासून काही मार्गावरील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी राष्ट्रीय महामार्गावर विडणी येथील नदीवजा ओढ्याला बुधवारी राञी महापूर आल्याने सकाळी आठ पर्यंत तब्बल १३ तास वाहतूक ठप्प होती. वाहनाच्या जवळपास पाच ते सहा किलोमीटर महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या होत्या. सध्या येथील वाहतुक धिम्या गतीने सुरु आहे.

सावधान! चक्रीवादळ सातारा-वडूजमार्गे जाणार मुंबईला

संततधार पावसामुळे म्हसवड भागातील माण नदीस पूर. नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडली. म्हसवड येथील माणनदीवरील पुलावरुन पाणी वाहू लागल्याने म्हसवड - आटपाडी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. उत्तर खटावमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून नेर तलाव ओसंडून वाहू लागला आहे. गोंदवल्यात माण नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. वाईच्या पूर्व भागात ओढ्याना पूर आला आहे.

काेयनासह, धाेम, उरमाेडी, तारळी, कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग

मायणीत मल्हारपेठ पंढरपूर रस्ता वाहून गेला आहे. येथील वाहतूक रात्रीपासून ठप्प झाली आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सोळशी, नायगाव, नांदवळ, रणदुल्लाबाद, पिंपोडे बुद्रुक, दहिगाव परिसरात झालेल्या पावसाने वसना नदी दुथडी भरून वाहत आहे.

शेतक-यांचा टाहाे; मायबाप सरकार काही काही राहिले नाही बघा

मोराळे- निमसोड रस्ता येरळा नदी वरून वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहतूक बंद झाला. विखळे तालुका खटाव येथील गावात जाणारा रस्ता वाहतुकीस बंद ठेवण्यात आला आहे. कराड पाटण तालुक्यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. कृष्णा- कोयना नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून ओढे नाले भरून वाहू लागले आहेत.

पाऊस आला धावून, रस्ता गेला वाहून!

म्हसवड येथील यात्रा पटांगणात सुमारे तीन फुट पाण्याची पातळी झाली आहे. येथील व्यावसायिकांची खोकी व पत्र्यांचे शेड वाहून गेले. यात्रा मैदान नजिकचा माण नदीवरील पुलावरुन पाणी वाहू लागल्यामुळे सांगली जिल्ह्याकडे ये-जा करणारी वाहतूक बंद पडली आहे.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rain Hits Phaltan Gondavale Mashwad Mayni Bridge Satara News