
सातारा : सातारा शहरासह जिल्हाभरात पावसाची रिपरिप आज सलग पाचव्या दिवशी सुरू होती. या मॉन्सूनपूर्व पावसाच्या सततच्या संततधारामुळे बाजारपेठ शुकशुकाट झाली असून, किरकोळ विक्रेत्यांसह शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील आले लागणीसह इतर पिकांच्या लावणीसाठी शेतजमिनींची मशागती पूर्णत: खोळंबलेल्या आहेत.