
जून महिन्यात पावसाने दडी मारल्यावर धरणे भरणार, की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
दिलासादायक! साताऱ्यातील प्रमुख धरणांत 75 टक्के पाणीसाठा
सातारा : जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेला मुसळधार पाऊस (Heavy Rain) पूरग्रस्तांसाठी हानीकारक ठरला असलातरी प्रमुख धरणात (Dam) पाणीपातळीत वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरला आहे. जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणात 75 टक्केवर पाणीसाठा झाला आहे. या धरणातील पाणीपातळी नियंत्रित राहण्यासाठी सर्वच धरणातून कमी अधिक प्रमाणात पाणी सोडले जात आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्यावर धरणे भरणार, की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, जुलै महिन्याच्या मध्यावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठी चिंता कमी झाली आहे. सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर मुसळधार पावसामुळे धरणात कमी कालवधीत जास्त पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठी नियंत्रित करण्यासाठी सर्वच धरणातून पाणी सोडावे लागल्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतीचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. धरणातून अजूनही पाण्याचा विसर्ग ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा: कऱ्हाडात तब्बल 905 जणांकडे परवानाधारक बंदुका
सध्या कोयना धरणातून 45 हजार 358 क्युसेक (Koyna Dam) पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या कोयना एकूण 84.86 टीएमसी म्हणजेच 80.62 टक्के धरण भरले आहे. धोम धरणात 10.39 टीएमसी म्हणजेच 76.99 टक्के असून 534 क्युसेक कण्हेर धरणात 7.74 टीएमसी म्हणजेच 76.62 टक्के असून 574 क्युसेक, धोम-बलकवडी धरणात 3.38 टीएमसी म्हणजेच 82.72 टक्के असून 267 क्युसेक, तारळी 5.03 टीएमसी म्हणजेच 85.87 टक्के असून 1712 क्युसेक, उरमोडी धरणात 7.49 टीएमसी म्हणजेच 75.21 टक्के 450 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या धरण क्षेत्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवकेत वाढ होत असल्याने विसर्ग कायम ठेवण्यात आला आहे.
Web Title: Rain Update 75 Percent Water Storage In The Main Dam Of Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..