esakal | काेयनासह, धाेम, उरमाेडी, तारळी, कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

काेयनासह, धाेम, उरमाेडी, तारळी, कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग

आजही (गुरुवार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कृष्णा नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.

काेयनासह, धाेम, उरमाेडी, तारळी, कण्हेर धरणातून पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश प्रमुख धरणातून पाणी साेडण्यात आले आहे.

दरम्यान पावसाचा जोर वाढल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुट सहा इंच उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता काेयना धरणातून 34211 इतका क्यूसेक पाण्याचा विसर्ग हाेता अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. जिल्ह्यातील धाेम, कण्हेर, उरमाेडी, तारळी येथून देखील पाणी साेडण्यात आले. आज (गुरुवार) सकाळी आठ वाजता विविध धरणातील साेडण्यात आलेल्या पाण्याचा विसर्ग पुढील प्रमाणे कोयना :- 34211 क्यूसेक, धोम :- 3515,  कण्हेर :- 3566, उरमोडी :- 400, तारळी :- 3641.

मच्छीमारी नौका देवगडच्या आश्रयाला

आजही (गुरुवार) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. विशेषतः कृष्णा नदीकाठच्या लोकांनी सावधानता बाळगावी असे आवाहन केले आहे.

उरमोडी धरणाचे  वक्र द्वार क्र १ व ४ हे बुधवारी रात्री ९ वाजता ०.२५  मीटरने उचलण्यात आलेले होते. आवकमध्ये  वाढ होत असल्याने रात्री ११ वाजता वक्रद्वार २ व ३ हे ०.२५ मीटरने उचलण्यात आले. त्यानंतरही पाणी पातळी वाढ झाल्याने सर्व चारही वक्र दरवाजे ०.२५ मीटर वरून ०.५० मीटरपर्यंत उचलन्यात आले. त्यामुळे सांडव्यातून ५७९१ + विद्यूत गृह  ४५० क्यूसेक असा एकूण ६२४१ क्यूसेक विसर्ग उरमोडी नदी पात्रात करण्यात आला.

शेतक-यांचा टाहाे; मायबाप सरकार काही काही राहिले नाही बघा

आज (गुरुवार) पहाटे पाच वाजता धरणाचा सांडव्यातून सोडलेला विसर्ग बंद करण्यात आलेला आहे. सध्या विद्यूत गृहातून 400 क्यूसेक इतका विसर्ग उरमोडी नदी पात्रात करण्यात येत आहे. पर्जन्यमान व आवक यात वाढ झाल्यास पुन्हा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाने कळविली आहे.

लॉकडाउनमध्ये बचत गटांच्या महिला लक्षाधीश!