मराठवाडीसह महिंद धरण दुसऱ्यांदा 'ओव्हर फ्लो'; पावसामुळे जलाशय तुडुंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwadi Dam

धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडी धरण या पावसाळ्यात दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाले आहे.

मराठवाडीसह महिंद धरण दुसऱ्यांदा 'ओव्हर फ्लो'

ढेबेवाडी (सातारा) : धरण क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाडी धरण (Marathwadi Dam) या पावसाळ्यात दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो झाले आहे. महिंद धरणाच्या (Mahinda Dam) पाणी पातळीतही वाढ होऊन सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे. पावसाळ्याच्या उत्तरार्धात दोन्ही धरणे फुल्ल असल्याने उन्हाळ्यात वांग खोऱ्यातील शेतीला पाणी पुरून उरेल, असा अंदाज आहे.

वांग नदीवरील (Wang River) महिंद धरणाचे बांधकाम काही वर्षांपूर्वीच पूर्ण झालेले असले, तरी मराठवाडी धरणाचे बांधकाम मात्र, २४ वर्षे उलटूनही सुरूच आहे. २.७३ टीएमसी क्षमतेच्या या धरणाच्या सांडव्याचे बांधकाम जसजसे पूर्णत्वाकडे जात आहे, तसतसा त्यात पाणीसाठा वाढत आहे. जुलैच्या उत्तरार्धात परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडी धरण ओव्हर फ्लो झाले होते. त्यानंतर पावसाच्या उघडिपीमुळे पाण्याची आवक मंदावल्याने धरणाच्या सांडव्यातील विसर्ग बंद झालेला होता. मात्र, अलीकडे चार दिवसांपासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरण ओव्हर फ्लो झाले आहे.

हेही वाचा: उंब्रज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना मदतीची आस

मराठवाडी धरणातील आजची पाणीस्थिती पुढीलप्रमाणे होती. पाणीपातळी ६५०.१० मीटर, एकूण पाणीसाठा ५२.७३ दशलक्ष घनमीटर, जिवंत पाणीसाठा ५२.५० दशलक्ष घनमीटर, एकूण टक्के १००.७२ टक्के, कालच्या दिवसभरातील पाऊस नऊ मिलिमीटर, एकूण पाऊस १३४६ मिलिमीटर, पाण्याची आवक २८० क्यूसेक, सांडव्यातील विसर्ग १०५ क्यूसेक, गेटमधील विसर्ग १७५ क्यूसेस.

हेही वाचा: कोयनेत पाण्याची आवक कमी; धरणाचे सर्व दरवाजे बंद करणार

सेल्फी काढताना दिसल्यास कारवाई

सध्या गणेशोत्सवामुळे चाकरमानी गावी आले असून, गावागावांत गजबज वाढली आहे. तुडुंब धरण आणि सांडव्यावरून वाहणारे पाणी बघायला धरणस्थळी लोकांची वर्दळ वाढल्याने पोलिसांनी त्या परिसरात पेट्रोलिंग सुरू केले असून, धरण परिसरात कुणी फिरताना, पोहताना किंवा सेल्फी काढताना दिसल्यास कारवाई करण्यात येत असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार यांनी सांगितले.

Web Title: Rain Update Marathwadi Dam Mahinda Dam Overflow

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathwadi DamMahinda Dam
go to top