esakal | दहिवडीसह पुसेगाव, गोंदवले, कुकुडवाडला मुसळधार पावसाने झोडपले
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy Rain

आज माण परिसराला मुसळधार पावसाने साधारण अडीच ते तीन तास झोडपले.

दहिवडीसह पुसेगाव, गोंदवले, कुकुडवाडला मुसळधार पावसाने झोडपले

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी (सातारा) : गेली कित्येक दिवस ज्या पावसाची नागरिक वाट पाहत होते, त्या दमदार पावसाने (Heavy Rain) आज शहरात हजेरी लावली. शहर व परिसराला मुसळधार पावसाने साधारण अडीच ते तीन तास झोडपले. माणमध्ये (Maan Taluka) सर्वत्र हिरवागार परिसर दिसत असला, तरी पाण्याची मात्र टंचाई निर्माण होवू लागली होती.

कारण, मागील काही महिन्यात माणमध्ये सर्वत्र रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे पिके हिरवीगार दिसत होती. तर गवत उगवल्यामुळे रानोमाळ, डोंगर, टेकड्या सुध्दा हिरवागार झाले होते. त्यामुळे माणमध्ये पाण्याची परिस्थिती चांगली असेल, असा भ्रम निर्माण झाला होता. मात्र, तुटपुंज्या पावसाने कुठेही पाणी झाले नव्हते. मागील वर्षीचा शिल्लक पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत होता. यामुळे दमदार पावसाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत होते.

हेही वाचा: बीजिंगमध्ये मुसळधार; पावसाच्या पाण्यात तरंगताहेत 'कार'

आज दुपारी नागरिकांची ती आतुरता संपुष्टात आली. साधारण दुपारी अडीचच्या सुमारास शहर व परिसरात संततधार पावसास सुरुवात झाली. हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला. एक तासानंतर पावसाचा जोर वाढून मुसळधार पाऊस पडू लागला. हा पाऊस एक तासभर पडत होता. साधारण अडीच ते तीन तास सलग पाऊस पडल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्त्यावरुन तसेच गटारे भरून खळाळून पाणी वाहिले. या पावसाने नागरिकांच्यात समाधानाचे वातावरण असून असाच अजून काही दिवस पाऊस पडला, तर यावर्षीची पाण्याची चिंता संपुष्टात येईल. दरम्यान, या पावसाने तालुक्यातील पुसेगाव, कुकुडवाड परिसराचेही मोठे नुकसान केले आहे.

loading image
go to top