कृष्णा-कोयनासह उपनद्यांच्या पाणीपातळीत घट; पुराचा धोका टळणार?

Koyna River
Koyna Riveresakal

कऱ्हाड (सातारा) : पावसाचा (Heavy Rain in Karad Patan) जोर कमी झाल्यामुळे कृष्णा-कोयनासह (Krishna-Koyna River) अन्य उपनद्यांच्या पाणी पातळीत आज सकाळपासून घट होत आहे. त्यामुळे पुरातून कऱ्हाड-पाटण तालुक्याला दिलासा मिळेल, असे चित्र निर्माण झाले आहे. पावसानेही पहाटेपासून उसंत घेतल्याने पुरातून दोन्ही शहरासह तालुक्यांतील नदीकाठच्या गावांना सुटका मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. (Rain Update Today Intensity Of Rain In Karad Patan Has Started Decreasing bam92)

Summary

तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरासह तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा-कोयनासह अन्य उपनद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती.

तीन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसाने शहरासह तालुक्यातून वाहणाऱ्या कृष्णा-कोयनासह अन्य उपनद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे पाणी नदीपात्राबाहेर आले होते. त्यातच कोयना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळेही नदीचे पाणी नागरीवस्तीत घुसले होते. पावसाचा जोर आणि धरणातून सोडलेले पाणी यामुळे पुराची स्थिती निर्माण झाली होती. कोयना पुलाजवळ कोयना नदीने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल सुरूवात केली होती.

Koyna River
आभाळ फाटल्यागत पाऊस अन् डोळ्यांदेखत वाहून गेली घरं!

कृष्णा नदीकाठच्या श्री. कृष्णाबाई मंदिरासह तो परिसर पाण्यात गेला होता. खोडशी बंधाऱ्याजवळ नदीच्या पाण्याची पातळी 10 फूट होती. शहरातील पाटण कॉलनी, दत्त चौक, पायऱ्याखालील भाग, कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोल पंप, कृष्णा नाका, सोमवार पेठ, कुंभार पाणंद येथेही नदीचे पाणी आले होते. त्यामुळे शहरातील सुमारे 160 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले होते. दरम्यान, आज पहाटेपासून पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. नदीकाठच्या गावातील पाण्याची पातळीही कमी झाली आहे. त्यामुळे पुरापासून कऱ्हाड-पाटण शहरासह तालुक्याला दिलासा मिळाला आहे.

Rain Update Today Intensity Of Rain In Karad Patan Has Started Decreasing bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com