आभाळ फाटल्यागत पाऊस अन् डोळ्यांदेखत वाहून गेली घरं!

Landslide Aambeghar
Landslide Aambegharesakal

पाटण (सातारा) : आभाळ फाटल्यागत पडणारा पाऊस (Heavy Rain in Patan Taluka), डोळ्यादेखत वाहून गेलेली घरे, चार कुटुंबांतील १४ आप्त स्वकीयांसह भूस्खलनात (Landslide In Aambeghar) गाडली गेलेली जनावरे असं आख्खं दुःख डोळ्यात घेऊन आंबेघर तर्फ मरळीच्या वाचलेल्या सहा घरांतील बारा जणांनी रात्रच जागून काढली. डोंगर खचल्याने झालेल्या भूस्खलनाने त्यांच्या आयुष्यात ती काळरात्र ठरली. त्या वेळी संकटरूपी अंधार चिरत त्यांनी जागवलेली दुःखाची रात्र सकाळी स्थानिक गावकऱ्यांच्या कुशीतच मोकळी झाली. (Rain Update Landslide In Ambeghar At Patan Taluka bam92)

Summary

भूस्खलनाचे मध्यरात्री संकट आले. रात्री अडीचच्या सुमारास वस्तीच्या दक्षिण बाजूचा डोंगर खचू लागला. बघता बघता खचलेल्या डोंगराचा भराव वस्तीवर आदळला.

मोरणा गुरेघर धरणाच्या (Morna Gureghar Dam) दक्षिण बाजूस निसर्गाच्या व डोंगरांच्या कुशीतील गाव म्हणजे आंबेघर तर्फ मरळी. वास्तविक तेथे डोंगराकडेला वसलेल्या दोन वाड्या. त्यात एक खालची, तर दुसरी वरची आंबेघर तर्फ मरळी. ती दोन्ही गावे पहाटेपासून हादरली होती. खालचे आंबेघर तर्फ मरळी डोंगराच्या भूस्खलनात वाहून गेले होते. तेथे अवघ्या दहा कुटुंबांची वस्ती, तेथेच विपरित घडलं होते. रोजच उशाला असलेला डोंगरच खचला. भूस्खलनाचे मध्यरात्री संकट आले. रात्री अडीचच्या सुमारास वस्तीच्या दक्षिण बाजूचा डोंगर खचू लागला. बघता बघता खचलेल्या डोंगराचा भराव वस्तीवर आदळला. चार घरांतील गाढ झोपलेले १४ जण कुटुंबासहीत ४० जनावरांवर त्याच भरावाखाली गाडले गेले. अन्य घराकडे तो भराव सरकू लागला. मात्र, त्या कुटुंबातील तरुण जागा झाला.

Landslide Aambeghar
Satara Landslide : साताऱ्यात मृत्यूतांडव; भूस्खलनात 10 जणांचा बळी

त्याला घरे हालताहेत लक्षात आल्यावर त्याने काही कळायच्या आतच आरडाओरड सुरू केला. पुढे होऊन अन्य घरांतील माणसे घराबाहेर काढण्याची धडपड केली. संकट आल्याने सारे सुन्नच होते. चार घरे वाहून गेल्याचे दुःख झेलत ते रात्रभर जागले. पुढे अंधारातच स्थितीचा अंदाज घेत जनावरे बाहेर काढण्याचे धाडस केले. त्यामुळे वीसवर जनावरांचाही जीव वाचला. सकाळी स्थानिकांच्या मदतीमुळे रात्रभर साचलेला बांध गावकऱ्यांच्या कुशीत हंबरड्याच्या रूपाने फुटला. वाचलेल्यांनी दुःखाला वाट मोकळी करून दिली. वाचलेल्यांनीच मोबाईलवरून माहिती दिल्याने ती सर्वदूर माहिती गेली. गोकूळपासून पायी चालत स्थानिकांची मदत पोचली खरी मात्र तीही तोकडीच, शासकीय मदत पोचविताना मोठ्या अडचणी येत होत्या. आंबेघरला जाणारे सारे रस्ते पाण्याखाली गेले होते. त्यामुळे बचाव कार्यात अडचणी येत होत्या, तरीही ग्रामस्थांनी धीर सोडला नव्हता.

Landslide Aambeghar
भूस्खलन झालेल्या भागात तातडीने मदत करा
Landslide In Aambeghar
Landslide In Aambeghar

अधिकाऱ्यांची मने हेलावली

तहसीलदार टोंपे, गटविकास अधिकारी साळुंखे त्यांचे पथक तेथे पोचले होते. मात्र, तातडीने उपाय करणे अवघड झाले होते. बातमी वाऱ्यासारखी मोरणा विभागात पसरली. नेरळे पुलावरील पाणी कमी झाल्याने नेरळे मार्गे तहसीलदार योगेश्वर टोंपे व गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी गोकूळ फाट्यापर्यंत पोचले. चार किलोमीटर पायी प्रवास करून घटनास्थळ गाठले. परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर अधिकाऱ्यांची मने हेलावली. दुर्घटनेतील गोकूळ, धावडे गावांत सुरक्षित ठिकाणी हलविण्यातही तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी हातभार लावत सूचना दिल्या.

Rain Update Landslide In Ambeghar At Patan Taluka bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com