अवकाळी पावसाने वाढविली माणवासियांची चिंता; द्राक्ष,आंबा,ज्वारीचे नुकसान

अवकाळी पावसाने वाढविली माणवासियांची चिंता; द्राक्ष,आंबा,ज्वारीचे नुकसान

म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून अकस्मातपणे सर्वत्र ढगाळ हवामानाबरोबरच धुके टिकून राहून रात्रंदिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्याने आंबा, द्राक्षासह रब्बी हंगामातील फुलोऱ्यास आलेल्या ज्वारीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पळसावडे, देवापूर, काळचौंडी, जांभुळणी, वरकुटे- मलवडी, हिंगणी, शेनवडी आदी गावांच्या परिसरात द्राक्ष व आंब्याच्या बागा मोठ्या संख्येने आहेत. पळसावडे येथे सुमारे 300 एकर क्षेत्रात द्राक्ष बागा असून, सध्या द्राक्ष घडांनी बहरून गेल्या आहेत. द्राक्षापासून उच्च प्रतीचा निर्यातक्षम बेदाणाही शेतकरी बांधव तयार करत असतात.

गेले दोन दिवस हवामानात अकस्मातपणे बदल होऊन सर्वत्र ढगाळ हवामान टिकून राहिले व दाट धुके पडून रात्रंदिवस पावसाची रिपरिप सुरू राहिल्यामुळे द्राक्ष घडात पाणी साचून राहून दवण्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत जाणवू लागला आहे. द्राक्ष मण्यास तडे जाण्याचेही प्रकार सुरू आहेत. द्राक्ष घडात पाणी साचून कुजवा रोग, द्राक्षास तडे जात असल्याने उत्पन्नात किमान 40 टक्के घट होणार आहे, अशी माहिती पळसावडेचे नानासाहेब पोळ यांनी दिली.

ठरलं तर! प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय आठवडाभरात; पृथ्वीराज चव्हाणांचे सूतोवाच 

आंबा बागांवरही धुकट पावसाळी हवामानाचा परिणाम झाला आहे. मोहरांनी बहलेल्या आंब्याच्या झाडावर कुजवा रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळधारणा होण्यापूर्वीच मोहर पावसाने कुजून तो गळून पडत असल्याचे प्रकार सुरू झाल्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल आहेत. अवकाळी पावसाचा ज्वारीवरही फटका बसला आहे. ढगाळ व धुकट हवामानाबरोबरच रिपरिप पाऊस पडल्यामुळे फुलोऱ्यात आलेल्या ज्वारीच्या कणसावर त्याचा विपरित परिणाम होत आहे.

बसण्यापूर्वीच करा वयाचा विचार, अन्यथा खावी लागणार तुरुंगाची हवा; जाणून घ्या हे महत्वाचे नियम

काय सांगता! सातारा ते कागल महामार्गावर बनणार सर्वाधिक लांबीचा उड्डाण पूल 

रिमझिम पावसामुळे कणसावरील फुलोरा झडून गेल्याचा प्रकार घडला आहे. कणसात दाणे भरू शकणार नसल्याने ज्वारीच्या उत्पन्नातही घट होणार आहे. पळसावडे येथे आमची तीन एकर द्राक्ष बाग आहे. बागेत समाधानकारक फळधारणा झाली आहे

देवापुरात केसर आंब्याची 150 झाडांची बाग मोहरांनी बहरली आहे. रिमझिम पाऊस व दाट धुक्‍यामुळे झाडावरील मोहर कुजून गळू लागल्याने, तसेच मोहराची गळती सुरू झाल्यामुळे फळधारणेवर परिणाम होणार आहे.

- उद्धव बाबर, देवापूर

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com