कऱ्हाडकरांनाे! जाणून घ्या अर्थसंकल्पातील "जनशक्ती'ची उपसूचना

कऱ्हाडकरांनाे! जाणून घ्या अर्थसंकल्पातील "जनशक्ती'ची उपसूचना

कऱ्हाड : पालिकेच्या अर्थसंकल्पावरून भाजप व जनशक्ती आघाडीमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आणि त्याच सभेत मांडलेले 134 कोटी 79 लाख 20 हजार 480 रुपयांच्या अर्थसंकल्पाला "जनशक्ती'ने उपसूचना देऊन त्याच अर्थसंकल्पामध्ये काही बदल सुचवले. महत्त्वाच्या बाबींत बदल केल्यामुळे तोच अर्थसंकल्प 270 कोटी 99 लाख 20 हजार 840 रुपये इतका झाला आहे. त्याची उपसूचना बहुमताने मंजूर झाल्याचा दावा "जनशक्ती'चा आहे. तर मूळ सूचनाच योग्य असल्याचा दावा भाजपचा आहे. त्यामुळे तो अर्थसंकल्प जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात अंतिम मंजुरीला जाणार आहे. कोणतीही करवाढ नसली तरी उत्पन्नाच्या बाबींवर जास्त खर्च न केल्याच्या भाजपच्या सूचनेच्या की, त्याच सूचनेत आमूलाग्र बदलाची उपसूचना मांडून दुरुस्त केलेला "जनशक्ती'चा अर्थसंकल्प मंजूर होणार, याकडे शहराचे लक्ष लागले आहे. 

पालिकेच्या मासिक बैठकीत नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी अर्थसंकल्प मांडला. नगरसेवक सुहास जगताप यांनी 134 कोटी 79 लाख 20 हजार 480 रुपयांच्या अर्थसंकल्पाची सूचना मांडली. त्यावर "जनशक्ती'सह लोकशाही आघाडीने आक्षेप नोंदवला. त्यात लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांनी पहिल्यांदा शरसंधान साधले. कोणीतीही अपेक्षा पूर्ण नसलेला होपलेस अर्थसंकल्प अशी टीका करत त्यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या दरवाढीला विरोध केला. त्याच मुद्यावर "जनशक्ती'नेही आवाज उठवत तो अर्थसंकल्प फेटाळत उपसूचना मांडली. "जनशक्ती'चे गटनेते राजेंद्र यादव यांनी आक्षेप नोंदवत अनेक विकासकामांचा त्यांच्या उपसूचनेत समावेश केला. त्यामुळे 134 कोटी 79 लाख 20 हजार 480 रुपयांचा अर्थसंकल्प 270 कोटी 99 लाख 20 हजार 840 इतका झाला आहे. तो बहुमताने मंजूर आहे, असा "जनशक्ती' तर भाजप मूळ सूचनाच मंजूर असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे त्याच्या कायदेशीर बाबी बघून सूचना व उपसूचना मंजुरीला जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे अंतिम मंजुरीला पाठवला जाणार आहे. त्यामुळे कोणता अर्थसंकल्प मंजूर होणार, याची उत्सुकता लागून आहे. सूचना व उपसूचना पाहून त्यातील कायदेशीर बाबी तपासून दोन्ही गोष्टी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवल्या जातील. कोणता अर्थसंकल्प मंजूर करायचा याचा निर्णय तेच घेतील, असे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी "सकाळ'ला सांगितले. 

...अशी आहे "जनशक्ती'ची उपसूचना 

"जनशक्ती'ने मांडलेल्या उपसूचनेमध्ये निसर्ग पर्यटनासाठी 5.50 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून 73 कोटी, अल्पसंख्याक योजनेतून 30 लाख, यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दीतून चार कोटी 25 लाख, युडी सहा योजनेतून 11 कोटी 50 लाख, विशेष रस्ता अनुदानातून दोन कोटी दहा लाख, अग्निसुरक्षा योजनेतून एक कोटी 90 लाख, नगरोत्थान योजनेतून एक कोटी 98 लाख, प्रधानमंत्री आवास योजनेतून 31 कोटी 30 लाख, क्रीडा विकासमधून 70 लाख, मत्स्य विक्री केंद्र अनुदान एक कोटी 75 लाख, 15 व्या वित्त आयोगातून दोन कोटी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतून 75 लाख अशी तरतूद करावी, असे सुचविण्यात आले आहे.

पृथ्वीराज चव्हाणांनी अर्थसंकल्पाच्या भाषणाची नरेंद्र माेदी सरकारला करुन दिली आठवण, वाचा सविस्तर

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com