
पंढरपूर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांच्यात सुरू असलेल्या वादात आता मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी उडी घेतली आहे. लक्ष्मण हाके हा सरकारचा पाळीव श्वान आहे. त्याला मराठा समाजावर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर भुंकण्यासाठी मोकळा सोडला आहे, असा हल्लाबोल करत यापुढे लक्ष्मण हाकेंनी मराठा नेत्यांवर आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर पातळी सोडून टीका केली तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा श्री. गायकवाड यांनी दिला आहे.