
पिंपोडे बुद्रुक: कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात गांजाची राजरोसपणे विक्री सुरू आहे. या रॅकेटमध्ये काही महिलांचा समावेश असल्याची चर्चा असून, पिंपोडे बुद्रुकसह वाठार स्टेशन या बाजारपेठेच्या गावात गांजा विकला जात आहे. अल्पवयीन मुले या व्यसनाच्या आहारी जाऊ लागली आहेत. ग्राहकाने कोणालाही इशाऱ्याने खुणावल्यास त्याला गांजा मिळणाऱ्या ठिकाणचा पत्ता कळतो. मात्र, पोलिस याबाबत अनभिज्ञ असल्याने भावी पिढीला कोण वाचवणार, असा प्रश्न पालकांना पडला आहे.