गट-तट, पक्षीय भूमिका बाजूला ठेवत ग्रेड सेपरेटरचा ताबा घ्या; रामराजेंचे सातारा पालिकेस आवाहन

गिरीश चव्हाण
Sunday, 31 January 2021

या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा माधवी कदम यांनासुध्दा निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रण असूनही त्यांनी कार्यक्रमास गैरहजेरी लावली. त्यांच्याबरोबरच "साविआ'चे सर्वच नगरसेवक गैरहजर होते, तर "नविआ'चे नगरसेवक उपस्थित होते.

सातारा : ग्रेड सेपरेटरचे काम केंद्र, राज्य शासनाच्या 76 कोटींच्या निधीतून पूर्ण झाले आहे. त्याचे उद्‌घाटन कोणी केले, का केले, कसे केले, हा प्रश्‍न राजकीय आहे. काम करून घेणे आणि राजकारण कमी करणे हा विषय महत्त्वाचा असून, आज या कामाचे अधिकृत उद्‌घाटन माझ्या हस्ते झाले आहे. सातारा पालिकेने गट-तट, पक्षीय भूमिका बाजूला ठेवत ग्रेड सेपरेटरचा ताबा घेण्याचे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांनी नुकत्याच झालेल्या येथील कार्यक्रमादरम्यान केले. 

ग्रेड सेपरेटर उद्‌घाटन, लोकार्पण समारंभासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, कार्यकारी अभियंता संजय दराडे, वनसंरक्षक भारतसिंह हाडा, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार आदी उपस्थित होते.
 
रामराजे म्हणाले, ""ग्रेड सेपरेटरचे शासकीय उद्‌घाटन, लोकार्पण तुमच्या हस्ते करावयाचे आहे, असा निरोप मला पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला. मी म्हटले येतो, करतो. जबाबदारी माझ्यावर दिल्याने मी लोकार्पण करत ही सुविधा नागरिकांसाठी खुली केली. येथे आवश्‍यक सुविधा उभारणे, देखभालीसाठीच्या निधीची तरतूद होणे आवश्‍यक आहे. ग्रेड सेपरेटरमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घ्यावा, कारण पालिकेकडे त्यासाठी तज्ज्ञ नाहीत.'' ग्रेड सेपरेटरचे काम कसे झाले आहे, हे आत्ताच सांगता येणार नसल्याचे वक्‍तव्यही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमादरम्यान बाळासाहेब पाटील, श्रीनिवास पाटील, शंभूराज देसाई यांनी मनोगत व्यक्‍त केले. सुरुवातीस रामराजे यांच्या हस्ते बांधकाम विभागाच्या तसेच काम करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. 

मी इथं बरा आहे शिवेंद्रसिंहराजे; बाळासाहेबांच्या विनंतीवर फलटणच्या राजेंनी केले ग्रेड सेपरेटरचे उद्‌घाटन

"नविआ' हजर, "साविआ' गैरहजर 

या कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा माधवी कदम यांनासुध्दा निमंत्रित करण्यात आले होते. निमंत्रण असूनही त्यांनी कार्यक्रमास गैरहजेरी लावली. त्यांच्याबरोबरच "साविआ'चे सर्वच नगरसेवक गैरहजर होते, तर "नविआ'चे अशोक मोने, अमोल मोहिते, शेखर मोरे, अविनाश कदम, बाळासाहेब खंदारे व इतर नगरसेवक उपस्थित होते. 

त्यांनी सांगेल तसे तिने केले अन् ती फसली; बसला लाखभर रुपयांना गंडा

उदयनराजेंचा नामोल्लेख टाळला 

कार्यक्रमापूर्वी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी ग्रेड सेपरेटरच्या केलेल्या उद्‌घाटनाविषयी रामराजे तसेच इतरांना प्रश्‍न विचारण्यात आले. या प्रश्‍नांना रामराजेंनी त्याठिकाणी बगल दिली. यामुळे उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात त्यावर ते बोलतील, असे अनेकांना वाटत होते. मात्र, त्यांनी संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उदयनराजेंविषयी एकही वाक्‍य न उच्चारता आगामी काळातील राजकीय आतषबाजीला पूर्णविराम दिला.

आई... ग... उठ ग! उत्कर्ष, शौर्याच्या आक्रोशाने शेळकेवस्तीचे डोळे पाणावले

जर्मन भावंडांनी आईच्या लॉंड्रीत बुट शिवण्याचा व्यवसाय सुरु केला अन् पुमा आणि आदिदास कंपन्यांचा उदय झाला!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramraje Naik Nimbalkar Inagurated Satara Grade Seprator Satara Marathi News