
राजाळे : श्रीराम आणि साखरवाडीचा कारखाना चुकून बंद पडला, तर कुणाचा फायदा होईल? हा विचार फलटण तालुक्यातील जनतेने करावा. श्रीराम कारखान्यावर प्रशासक नेमून कारखान्याचे वाटोळे करायचे आणि कारखान्याचे एकदा वाटोळे झाले, की हा ऊस तिकडे न्यायचा, एवढा सरळ साधा हिशोब आहे, अशी टीका आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.
जाधववस्ती, राजाळे (ता. फलटण) येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच संभाजी निंबाळकर, श्रीराम साखर कारखान्याचे संचालक सुखदेव बेलदार यांच्यासह परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.