Jayakumar Gore : रामराजे निंबाळकर म्हणजे फलटण नव्हे : मंत्री जयकुमार गोरे
Karad News : विकास करताना सर्वांना सोबत घेण्याचे संस्कार यशवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाले आहेत. त्या माध्यमातून आम्ही तो वसा पुढे चालवत आहोत. त्यात फलटणही आहे. रामराजे म्हणजे फलटण नव्हे. फलटणची सामान्य जनता निश्चितपणे आमच्यासोबत आहे, असा विश्वास ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी आज व्यक्त केला.
कऱ्हाड : राष्ट्रवादी व रामराजेंशी असलेल्या संघर्षाबाबत तुम्ही विचारता; पण संघर्षात ताण व शक्ती उरलेली नाही. आहिस्ता आहिस्ता सर्व गोष्टी होत राहतील. रामराजे कोणत्या पक्षात आहेत, ते त्यांनाही माहिती नाही आणि आम्हालाही माहिती नाही.