esakal | कास पठारावर रानगव्यांची मुक्त भटकंती
sakal

बोलून बातमी शोधा

कास पठारावर रानगव्यांची मुक्त भटकंती

गव्यांचा मोठा कळप पठारावर चरताना पर्यटकांना आढळला.

कास पठारावर रानगव्यांची मुक्त भटकंती

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (सातारा): कास पठार पाहण्यासाठी खुले झाले आणि दोन वर्षांनंतर पर्यटक कास पठारावर धडकू लागले. या परिसरातील कायमचे रहिवासी असलेले रानगवे पठारावर अधूनमधून दर्शन देतात. काल सकाळीही गव्यांचा मोठा कळप पठारावर चरताना पर्यटकांना आढळला.

हेही वाचा: कास पठारला नेदरलँडच्या पर्यटकांची भेट

सध्या जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारावर निसर्गाने फुलांची केलेली मुक्त हस्ताने उधळण पाहण्यासाठी हजारो पर्यटक येतात. पावसाने संततधार सुरू केल्याने दोन दिवसांत आलेल्या अनेकांना पठारावरील फुलांचा आनंद घेता आला नाही. फुलांचे गालिचे तयार व्हायलाही पावसाने आडकाठी निर्माण झाली आहे. मोठ्या पावसामुळे पठार अद्यापही सुनेसुने वाटत आहे. त्यात गव्यांचे दर्शन झाले, तर एक वेगळा अनुभव पर्यटकांना भेटत आहे. हे रानगवे आहेत, समोर आले तर, त्यांना कोणीही हुसकावून लावण्याचा, दगड मारण्याचा प्रयत्न करू नये. त्यांना त्यांच्या मार्गाने पुढे जाऊ द्यावे. ते तेथून शांतपणे निघून जातात, असे ग्रामस्थांनी सांगितले. त्रास दिल्यास ते हल्ला करू शकतात. त्यामुळे कास पुष्प पठार किंवा परिसरात गवे दिसल्यास पर्यटकांनी त्यांना त्रास देऊ नये, असे आवाहन कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष मारुती चिकणे यांनी केले आहे.

हेही वाचा: कास पठारावर जाताय ? सावधान !;पाहा व्हिडिओ

दरम्यान, सलग सुट्यांमुळे कास परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती. शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवसांत हजारो पर्यटकांनी कासला भेट दिली. समितीच्या बसने पठारावर जाऊन मुसळधार पाऊस, प्रचंड धुके आणि सोसाट्याच्या वाऱ्यात पठारावर फुले पाहण्यासाठी जाणे आव्हानात्मक होते. फुलेही पाहता आली नाहीत, असे मुंबईतील (कळंबोली) पर्यटक डॉ. महेश चौधरी यांनी सांगितले.

loading image
go to top