
सातारा : सातारा जिल्हा हा केवळ एक भौगोलिक अस्तित्व नाही, तर तो मराठा साम्राज्याच्या वैभवशाली इतिहासाचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांच्याही पदस्पर्शाने पावन झालेला, त्याग, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असणाऱ्या सातारा जिल्ह्याचे नाव बदलून ‘राजधानी सातारा’ करावा, अशी मागणी आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना निवेदनाद्वारे केली.