esakal | विनाकारण फिरु नका; तुमची हाेऊ शकते रॅपिड अँटीजन टेस्ट

बोलून बातमी शोधा

Covid 19 Test

विनाकारण फिरु नका; तुमची हाेऊ शकते रॅपिड अँटीजन टेस्ट

sakal_logo
By
जयभीम कांबळे

तळमावले (जि. सातारा) : राज्य शासनाने लॉकडाउन जाहीर केल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत आहे. क-हाडसह अन्य ग्रामीण भागात काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यातून तळमावले विभागही सुटलेला नाही. कुंभारगाव, गुढे, धामणी आदी ठिकाणे कोरोनाच्या विळख्यात सापडलेली आहेत. हा विळखा आता गावच्या वेशीच्या आत शिरला असून आता या वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनाची चिंता मात्र आणखी वाढली आहे. आता रुग्णाच्या अतिजवळच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वाराटाईन करण्यासाठी रुग्णालयात जागा अपुऱ्या पडतात की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.

त्यात कडक लॉकडाउन असून देखील बाहेर फिरणाऱ्या लोकांची वर्दळ दिसत आहे. त्यांना वेळीच आळा घालण्यासाठी येथील आरोग्य केंद्रामार्फत रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. यासाठी पोलिस प्रशासन विनाकारण रस्त्यावर फिरणा-यांवर कारवाई करत आहेत मात्र तरीदेखील अत्यावश्यक बाबींची खोटी कारणे सांगून लाेक बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता बाहेर पडणाऱ्या लोकांचा समाचार घेताना नामी शक्कल लढवून अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांची कोव्हिड टेस्ट केली जात आहे.

मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer