esakal | मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer

बोलून बातमी शोधा

Crime News
मोहिते-पाटलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढ; युवतीने धुडकावली Offer
sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : खेड- आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांना बदनाम करण्यासाठी हनी ट्रॅप रचणाऱ्या तिघांविरोधात सातारा तालुका पोलिस ठाण्यात काल रात्री गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शैलेश शिवाजीराव मोहिते-पाटील (रा. सांगवी, जि. पुणे), राहुल किसन कांडगे (रा. चाकण, जि. पुणे), सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आमदारांचे पुतणे मयूर साहेबराव मोहिते-पाटील यांनी फिर्याद दिली आहे. हनी ट्रॅपमध्ये सहभागी करून घेतलेल्या युवतीमुळेच हा कट उघडकीस आला.

शेलपिंपळगाव (ता. खेड, जि. पुणे) येथे मयूर साहेबराव मोहिते-पाटील हे राहण्यास असून, ते बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचे चुलते दिलीप दत्तात्रय मोहिते-पाटील हे खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. ता. 22 रोजी दुपारी सातारा येथून एका युवतीने मयूर यांना फोन केला. त्या युवतीने मयूर यांना आमदारांविषयी महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगितले. यावर मयूर यांनी जे काही सांगायचे असेल ते फोनवर सांगा, असे युवतीस सुनावले. यानंतर त्या युवतीने शैलेश शिवाजी मोहिते-पाटील आणि राहुल किसन कांडगे हे दोघे 10 ते 12 दिवसांपूर्वी सोमनाथ शेडगे याच्यासोबत साताऱ्यातील माझ्या फ्लॅटवर आले होते. त्यांनी नोकरीच्या निमित्ताने आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याजवळ जात संपर्कात राहून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे.

आज माझे लग्न आहे, मला पळवून न्या.. तुमची पुष्पा, आय लव्ह यू

यानंतर गुन्हा दाखल करून बदनामीची भीती दाखवून पैसे उकळायचे, असे त्या तिघांनी ठरवले आहे; पण हे मला न पटल्याने तुम्हाला फोन करून माहिती देत असल्याचे त्या युवतीने मयूर यांना सांगितले. यानंतर दुसऱ्या दिवशी मयूर हे चुलते राजेंद्र यांना घेऊन सातारा येथे आले. त्यांनी युवतीची भेट घेत पुन्हा चौकशी केली. या वेळी त्या युवतीने ता. 12 एप्रिल रोजी सोमनाथ दिलीप शेडगे (रा. सातारा) शैलेश मोहिते-पाटील, राहुल कांडगे यांच्यासोबत झालेल्या चर्चेची माहिती देत तिघांनी 1 लाख दिल्याचे सांगितले. मयूर यांनी नंतर सातारा तालुका पोलिस ठाणे गाठत घडल्याप्रकराची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यानंतर त्या युवतीस पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

युवतीने चौकशीत शैलेश मोहिते-पाटील, राहुल कांडगे, सोमनाथ शेडगे यांची नावे सांगत त्यांनी रचलेल्या कटाची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी मयूर मोहिते यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून, त्यानुसार शैलेश मोहिते-पाटील, राहुल कांडगे, सोमनाथ शेडगे या तिघांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून, अद्याप कोणाला अटक झालेली नाही. याचा तपास पोलिस निरीक्षक सजन हंकारे करत आहेत.

जीव जाऊ नये म्हणून आणू नका सांगताेय; डाॅक्टरांच्या आवाजात थरकाप

पुण्यात फ्लॅट देतो

आमदारांना हनी ट्रॅपमध्ये ओढत जास्त पैसे उकळण्याचा प्लॅन त्या तिघांनी रचला होता. यासाठी त्यांनी साताऱ्यातील युवतीला त्यात सहभागी करून घेण्याचे ठरवले होते. ठरल्याप्रमाणे प्लॅन यशस्वी झाल्यानंतर येणाऱ्या पैशातून पुण्यात फ्लॅट घेऊन देण्याचे आमिष त्या तिघांनी युवतीला दाखवले होते.

बेड पाहिजे, इंजेक्शन हवयं! भाजपच्या कार्यकर्त्यांना फाेन करा