esakal | छान किती दिसते 'फुलपाखरू'; उंडाळेत दुर्मिळ 'अटलास मोथ'चं दर्शन
sakal

बोलून बातमी शोधा

Atlas Moth

अटलास मोथ हे आशिया खंडातील जंगलात आढळणारा मोठा पतंग आहे.

छान किती दिसते 'फुलपाखरू'; उंडाळेत दुर्मिळ 'अटलास मोथ'चं दर्शन

sakal_logo
By
जगन्नाथ माळी

उंडाळे (सातारा) : येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर माध्यमिक विद्यालयाच्या (Dadasaheb Undalkar Secondary School) बागेमध्ये 'अटलास मोथ' (Atlas Moth) जातीचे दुर्मिळ फुलपाखरू Rare Butterfly (पतंग) आढळले. आपल्याकडे आढळणाऱ्या फुलपाखरापेक्षा हे खूपच मोठे असल्याने ते पाहण्यासाठी गर्दी झाली होती.

या पतंगाविषयी माहिती देताना अभ्यासक श्री. माने म्हणाले, ‘‘अटलास मोथ हे आशिया खंडातील (Asia Continent) जंगलात आढळणारा मोठा पतंग आहे. याचे पंख २४ सेंटीमीटरपर्यंत असतात. पंखांच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ सुमारे १६० सेंटीमीटरपर्यंत असते. यातील मादी नरापेक्षा मोठी असते. नराचे अँटेना मोठे असतात. मादी अंडी दिल्यानंतर मरते. दोन आठवड्यानंतर अंड्यातून धुळसर हिरव्या रंगाचे सुरवंट जन्मतात. ते लिंबू, पेरू, दालचिनी यांसारख्या सदाहरित झाडांवर अन्न खातात.

हेही वाचा: सिद्धार्थ शुक्लाकडे कोट्यवधींची संपत्ती

सुरवातीला अंड्याचे कवच हे त्यांचे अन्न असते. चार आठवड्यानंतर पतंग बाहेर पडतात. ऊर्जा वाचवण्यासाठी पतंग रात्री संचार करतात व दिवसा आराम करतात. त्यांच्याकडे पूर्णतः तयार झालेले मुख नसल्यामुळे, मोठे पतंग खाऊ शकत नाहीत. ते फक्त काही दिवस जगतात व जोडीदार शोधणे हा त्यांचा एकमेव उद्देश असतो. तैवानमध्ये याचे कोकून पर्स म्हणून वापरले जातात.’’ हे फुलपाखरू संजय पाटील यांना दिसले. यावेळी प्राचार्य बी. आर. पाटील, हरित सेना समन्वयक जगन्नाथ माळी आदी शिक्षक उपस्थित होते.

हेही वाचा: कसबा पेठ गणपतीचा इतिहास

loading image
go to top