esakal | सिद्धार्थ शुक्लाकडे कोट्यवधींची संपत्ती; महिन्याला कमवत होता 'इतके' रुपये
sakal

बोलून बातमी शोधा

Sidharth Shukla

सिद्धार्थ शुक्लाने 2008 मध्ये टीव्ही शो 'बाबुल का आँगन छूटे ना' याद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

सिद्धार्थ शुक्लाकडे कोट्यवधींची संपत्ती

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सिद्धार्थ जेव्हा 'इंडियाज गॉट टॅलेंट'चा (India's Got Talent) शो होस्ट करण्यासाठी येत होता, तेव्हा त्यानं त्यातही आपली चांगली छाप सोडली. बिग बॉस विजेता (Bigg Boss 13 Winner) झाल्यानंतर, सिद्धार्थ शुक्लाचे (Sidharth Shukla) फॅन फॉलोव्हर्सही खूप वाढले. मात्र, टीव्ही मालिका जगतातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज निधन झालं. सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. सिद्धार्थ शुक्लाने रात्री झोपण्यापूर्वी औषध घेतलं होतं. पण, कोणतं औषध घेतलं गेलं याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. असं म्हटलं जातं, की रात्री झोपल्यानंतर सिद्धार्थ सकाळी पुन्हा उठूच शकला नाही.

सिद्धार्थची मासिक कमाई

सिद्धार्थ शुक्लाने 2008 मध्ये टीव्ही शो 'बाबुल का आँगन छूटे ना' याद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानं लहान वयातच मोठी प्रसिद्धी कमावली. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी या अनुभवी टीव्ही अभिनेत्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती होती. मीडिया रिपोर्टनुसार, सिद्धार्थ शुक्लाकडे एकूण 10 कोटींची संपत्ती होती. दरम्यान, सिद्धार्थ शुक्ला एका महिन्यात 10 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करत होता.

हेही वाचा: सिद्धार्थच्या निधनाचे वृत्त कळताच शहनाज गिलने सोडलं शूटिंग

Sidharth Shukla

Sidharth Shukla

सिद्धार्थ इंटिरियर डिझायनरही होता

दिग्दर्शकांचा आवडता अभिनेता म्हणूनही त्याची खास ओळख होती. सिद्धार्थ शुक्ला त्याच्या कॉमिक टाइमिंग आणि नेचरल अभिनयासाठी देखील ओळखला जात होता. सिद्धार्थ नवनवे मित्र बनवण्यातही खूप पटाईत होता. 12 डिसेंबर 1980 रोजी जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाची उंची सुमारे 6 फूट होती. मुंबईत जन्मलेला सिद्धार्थ पेशानं सिव्हिल इंजिनिअरही होता. तो मूळचा इलाहाबादचा असून सिद्धार्थनं इंटिरियर डिझायनिंगचा कोर्सही केला आहे.

Interior designer

Interior designer

हेही वाचा: वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या सिद्धार्थचा 'प्रवास'

मुंबईत सिद्धार्थचं 'शाही जीवन'

मुंबईत सिद्धार्थ शुक्ला अगदी शाही जीवन जगत होता. अलीकडेच सिद्धार्थनं मुंबईच्या पॉश भागात एक घरही खरेदी केलं होतं. सिद्धार्थकडे सध्या हार्ले डेव्हिडसन फॅट बाईक आणि बीएमडब्ल्यू X5 सारखी महागडी कार होती. शालेय जीवनात सिद्धार्थला टेनिस आणि फुटबॉल खेळायला आवडायचे. सिद्धार्थ हा बॉलिवूडचा उगवता ताराही मानला जात होता. तो सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्येही गणला जात होता.

Sidharth Shukla

Sidharth Shukla

हेही वाचा: 'लव्ह यू जिंदगी' म्हणणारा सिद्धार्थ फक्त 'या' 6 जणांना करायचा फॉलो

सिद्धार्थची कमाई

सिद्धार्थ शुक्लाच्या कमाईचे मुख्य स्त्रोत अभिनय आणि ब्रँड एन्डोर्समेंट होतं. तो एका ब्रँडच्या अनुमोदनासाठी एक चांगली रक्कम आकारत होता. कमाईबरोबरच, सिद्धार्थ दानधर्म आणि सामाजिक कार्यातही अग्रेसर होता. सिद्धार्थ चित्रपट आणि मालिकांमधून दरवर्षी सुमारे एक कोटीची कमाई करत होता, तर तो ब्रँड एन्डोर्समेंटमधून वर्षाला एक ते दोन कोटी रुपये कमवत असे. सिद्धार्थ देशातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक बनला होता. सिद्धार्थनं वैयक्तिकरित्या खूप गुंतवणूक केली होती आणि तो रिअल इस्टेटमध्येही गुंतवणूक करत होता.

Sidharth Shukla

Sidharth Shukla

loading image
go to top