RSS route march in Panchgani fills the city with patriotic fervor and nationalist spirit.”
Sakal
सातारा
Rashtriya Swayamsevak Sangh: 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचगणीत संचलन'; शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण
Patriotic atmosphere created by RSS march in Panchgani: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे कार्य, स्वयंसेवकांची समाजासाठीची निःस्वार्थ सेवा व मदतीची परंपरा जनतेपर्यंत पोहोचावी हा प्रमुख उद्देश आहे. आज संघाचे कार्य केवळ भारतापुरते मर्यादित नसून जगभरातील ४६ हून अधिक देशांमध्ये सुरू आहे.
भिलार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पर्वानिमित्त पाचगणी शहरात शस्त्र पूजन सोहळा आणि संचलन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या संचलनात महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शाखांतील शेकडो स्वयंसेवकांनी सहभाग नोंदवला. स्वयंसेवकांची पारंपरिक वेशभूषा, हातातील दंड, बॅनर, घोषणाबाजी आणि संघगीतामुळे शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

