
सातारा : सर्वधर्मीय सण आणि उत्सवांना अधिकाधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून गेली अकरा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचे रूप नवे’ या अभियानांतर्गत अंनिस आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सातारा येथे बकरी ईदनिमित्त रक्तदानाने ‘कुर्बानी’चे नवे रूप समाजासमोर मांडले.