esakal | सावधान! मेरुलिंग घाटातून प्रवास ठरतोय जीवघेणा; वाहनांवर कोसळताहेत दरडी

बोलून बातमी शोधा

Meruling Ghat
सावधान! मेरुलिंग घाटातून प्रवास ठरतोय जीवघेणा; वाहनांवर कोसळताहेत दरडी
sakal_logo
By
प्रशांत गुजर

सायगाव (सातारा) : मेरुलिंग घाटातील (Meruling Ghat) प्रवास अलीकडे जीवघेणा ठरत आहे. घाटात धोकायदायक वळणावर नसलेले संरक्षक कठडे, अचानक कोसळणारी दरड, अनेक ठिकाणी खचलेला रस्ता अशा परिस्थितीमुळे चालकांना धोकादायक वळणावर वाहने चालवणे म्हणजे जीवघेणी कसरतच करावी लागत आहे. या घाटात झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम विभागाला जाग येणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (Accidents Are Dangerous In Meruling Ghat Satara News)

नरफदेव, सायगाव, आनेवाडी, रायगाव, महिगाव, दुदुस्करवादी, दरे खुर्द, मोरघर, पवारवाडी, महामूलकरवाडी, खर्शी या गावांतील लोकांना तालुक्‍याच्या मेढा या ठिकाणी जाण्याचा सोपा मार्ग म्हणून या घाटाचा वापर होतो. येथे पर्यटनाचा 'क' क्षेत्र दर्जा मिळालेले श्री क्षेत्र मेरुलिंग हे देवस्थान असल्याने भाविक, पर्यटक येतात. या घाटात रस्ता अरुंद असल्याने, तसेच कुठेही संरक्षक कठडे नाहीत. पावसाळ्यात घाटात ठिकठिकाणी दरडीही कोसळतात. अनेक ठिकाणी छोटे- मोठे दगड वाहनांसमोर येतात. ते चुकविण्याच्या नादात गंभीर घटनाही घडल्या आहेत.

आता खाेट बाेललात तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल हाेणार

पावसाळ्यात डोंगरातील लाल माती रस्त्यावर वाहून आल्याने वाहनांची घसरगुंडी होते. या धोकादायक स्थितीबाबत दै. 'सकाळ'नेही प्रकाश टाकला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. घाटात मोठी वळणे असणाऱ्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण काम अर्धवट आहे. डोंगर फोडल्याने दगड निसटले आहेत. संबंधित विभागाने वेळीच कामे पूर्ण करून विविध उपाययोजना केल्या असल्या तर तीन जणांचा जीव गेला नसता. घाटात धोक्‍याच्या ठिकाणी, वळणावर दिशादर्शक फलक लावावेत, वळणावर संरक्षक कठडे बांधून घ्यावेत, अरुंद रस्ते व वळणे रुंद करावीत आदी सूचना चालकांनी केल्या आहेत.

मेरुलिंग घाटात कोणत्याही पद्धतीच्या सुरक्षित सुविधा नसल्यामुळे अनेक ठिकाणी धोक्‍याची स्थिती आहे. संबंधित विभाग त्याकडे अजिबात लक्ष देत नसल्याने ही वेळ आली आहे. आता तरी प्रशासनाने जागे होत उपाययोजना कराव्यात.

-सुहास गिरी, माजी सभापती, जावळी

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Accidents Are Dangerous In Meruling Ghat Satara News