रयत बॅंकेच्या निवडी बिनविरोध; अध्यक्षपदी पोपटराव पवार, उपाध्यक्षपदी लालासाहेब खलाटे

दिलीपकुमार चिंचकर
Tuesday, 15 September 2020

यंदा बॅंकेस सन 2019-20 मध्ये नऊ कोटी लाख 25 हजार नफा झाला आहे.

सातारा : येथील दि रयत सेवक को- ऑपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळाची सभा छत्रपती शिवाजी कॉलेजमधील सभागृहात अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक अधीन जिल्हा उपनिबंधक पी. के. काळे यांच्या अध्यक्षतेखाली होऊन बॅंकेच्या अध्यक्षपदी पोपटराव पवार, उपाध्यक्षपदी लालासाहेब नारायणराव खलाटे यांची बिनविरोध निवड झाली.
 
दि रयत सेवक को- ऑपरेटिव्ह बॅंक ही महाराष्ट्रातील पगारदार नोकरदारांच्या बॅंकांमधील अग्रेसर बॅंक असून, बॅंकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून, बॅंकेच्या 20 शाखा, 31 मार्च 2020 अखेर 11121 सभासद, ठेवी 1143.20 कोटी असून, बॅंकेने 717.08 कोटी इतके कर्जवाटप केले आहे. बॅंकेस सन 2019-20 मध्ये नऊ कोटी लाख 25 हजार नफा झाला आहे. नूतन अध्यक्ष श्री. पवार हे गोटे (ता. कऱ्हाड) येथील रहिवासी असून, ते सध्या कऱ्हाड येथील यशवंत हायस्कूलमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. श्री. खलाटे हे डी. पी. रोड, माळवाडी, हडपसर-पुणे येथील रहिवासी असून, सध्या ते साधना विद्यालय, हडपसर-पुणे 28 येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन् दोन गटांच्या कार्यकर्त्यांत वाद, वाचा प्रकरण
 
या वेळी बॅंकेचे संचालक रामदास तांबे, विजयकुमार डुरे, अर्जुन मलगुंडे, बाबासाहेब शेख, प्रमोद कोळी, डॉ. विजय कुंभार, शहाजी मखरे, जंबूकुमार आडमुठे, सुकदेव काळे, सुभाष पाटील, राजेंद्र शिंदे, डॉ. बिरू राजगे, संचालिका सुनीता वाबळे, नीलिमा कदम, जनरल मॅनेजर संजयकुमार मगदूम, सभासद, बॅंक सेवक उपस्थित होते. 
बिनविरोध निवडीबद्दल "रयत'चे मॅनेजिंग कौन्सिल व उपमुख्यमंत्री अजित पवार, "रयत'चे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे, कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सरोज पाटील, ऍड. रवींद्र पवार, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, संजय नागपुरे, डॉ. शिवलिंग मेनकुदळे आदींनी अभिनंदन केले.

राजं, आम्हाला काय बी नग.. फकस्त त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rayat Cooperative Bank Election Satara News