esakal | पैसे द्या ! अन्यथा PPE Kit घालून आंदोलन करु; शेतक-यांसाठी दाेन दिवसांचा अल्टीमेटम
sakal

बोलून बातमी शोधा

Money

दाेन दिवसांत पैसे द्या ! अन्यथा PPE Kit घालून आंदोलन करु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : कारखान्यांना ऊस घातल्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना (Farmers) बिल अदा करणे एफआरपी कायद्यानुसार (FRP ACT) बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी कोरोनाचा आसरा घेऊन तब्बल चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना देणी दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, कारखान्यांनी येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांची देणी अदा करावित. अन्यथा, प्रत्येक कारखान्याच्या गेटसमोर पीपीई किट (PPE Kit) घालून आंदोलन केले जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ऊर्फ सोनू साबळे यांनी दिला. (rayat kranti sanghtana frp act farmers sugarcane satara marathi news)

जिल्ह्यातील किसन वीर, शरयू, जरंडेश्वर, स्वराज यांसह अनेक कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकवली आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना ऊस पिकाशिवाय इतर उत्पन्नाचे साधन नाही. लागवडीसाठी काढलेले कर्ज, तसेच कामगार व उदरनिर्वाह करण्यासाठी बॅंका व इतर माध्यमातून कर्जे काढावी लागली. त्या कर्जांची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांमागे तगादा सुरू आहे, असे असताना ज्या कारखान्यांना ऊस घालूनही चार महिन्यांपासून बिले जमा केलेली नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आता परिस्थिती सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे.

कारखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेली यंत्रणा चिरीमिरी मिळत असल्याने गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची लढाई स्वतः लढावी लागणार असून, त्यादृष्टीने आता दोन दिवसांत कारखान्यांनी देणी अदा करावीत. अन्यथा कोरोनाचे सर्व नियम पाळून व कोरोना प्रतिबंधात्मक पीपीई किट घालून आंदोलन करणार असल्याचा इशारा श्री. साबळे यांनी दिला आहे.

हेही वाचा: वाढत्या रुग्ण संख्येत महाराष्ट्रातील दाेन जिल्हे केंद्राच्या यादीत

सातारा जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

हेही वाचा: सातारा जिल्हा परिषदेचा केंद्रात डंका; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'दीनदयाळ पुरस्कारा'ने सन्मान