esakal | सातारा जिल्हा परिषदेचा केंद्रात डंका; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'दीनदयाळ पुरस्कारा'ने सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Zilla Parishad

सातारा जिल्हा परिषदेचा केंद्रात डंका; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'दीनदयाळ पुरस्कारा'ने सन्मान

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : केंद्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांची घोषणा काही दिवसांपूर्वी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली होती. त्या पुरस्कारांचे वितरण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-कार्यक्रमाव्दारे करण्यात आले. यात सातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार, तर गडहिंग्लज व राहाता पंचायत समित्यांसह राज्याच्या विविध भागातील १६ ग्रामपंचायतींना ई-कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार 2021 (पडताळणी वर्ष 2019-20) हा राज्यातून सातारा जिल्हा परिषदेला आणि गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) व राहाता (जि. नगर) या दोन पंचायत समित्यांना तसेच मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा), चंद्रपूर (ता. राहाता. जि. नगर), लोहगाव (ता. राहाता. जि. नगर), जाखोरी (ता. जि. नाशिक), गोवरी (ता. मौदा, जि. नागपूर), नागोसली (ता. इगतपुरी, जि. नाशिक), येनीकोनी (ता. नरखेड, जि. नागपूर), मरोडा (ता. मूल, जि. चंद्रपूर), तमनाकवाडा (ता. कागल, जि. कोल्हापूर), लेहेगाव (ता. मोर्शी, जि. अमरावती), वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली), देगांव (ता. वाई, जि. सातारा), अंजनवेल (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि पीरगयबवाडी (ता. घनसावंगी, जि. जालना) या 14 ग्रामपंचायतींना जाहीर झाला. सातारा जिल्हा परिषदेला 50 लाख रुपये, गडहिंग्लज (जि. कोल्हापूर) आणि राहाता (जि. नगर) या पंचायत समित्यांना प्रत्येकी 25 लाख रुपये आणि 14 ग्रामपंचायतींना लोकसंख्येप्रमाणे 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतची रक्कम पुरस्कार स्वरुपात देण्यात आली.

काय सांगता! फोटोग्राफरच्या बंगल्यात राहतात Canon, Nikon, Epson; वाचा 'क्लिक'ची भन्नाट स्टोरी

नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्कार 2021 हा राज्यातून मान्याचीवाडी (ता. पाटण, जि. सातारा) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस 10 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात दिला. ग्रामपंचायत विकास आराखडा पुरस्कार 2021 हा राज्यातून लोणी बुद्रुक (ता. राहाता, जि. नगर) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस 5 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त होईल. बालसुलभ ग्रामपंचायत पुरस्कार 2021 हा राज्यातून सिरेगाव (ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदीया) या ग्रामपंचायतीने पटकावला. या ग्रामपंचायतीस 5 लाख रुपये रक्कम पुरस्कार स्वरुपात प्राप्त झाले आहेत. या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींचे पंतप्रधान मोदींनी कौतुक करुन केंद्राकडून लागेल ती मदत करण्याची ग्वाही दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन घेण्यात आला होता. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींसह राज्यातील मान्यवर ऑनलाइन उपस्थित होते.

loading image