रयत शिक्षण संस्थेत 'यांना' मिळाली संधी

दिलीपकुमार चिंचकर
Tuesday, 21 July 2020

कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुढाकाराने शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागापर्यंत व तीही गरीबापर्यंत पोचावी, यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांसह कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात संस्थेचे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात संस्थेची 43 महाविद्यालये, 156 कनिष्ठ महाविद्यालये, 438 माध्यमिक विद्यालये, असा तब्बल 759 शाखांचा मोठा शैक्षणिक पसारा आहे. सातारा जिल्ह्यात सर्वाधिक व त्यानंतर नगर व नाशिक जिल्ह्यात संस्थेचा अधिक विस्तार आहे. संस्थेत 18 हजार शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा (रयतसेवक) समावेश असून, तब्बल साडेचार लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

सातारा : रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच ऑनलाइन झालेल्या मॅनेजिंग कौन्सिलच्या बैठकीत संस्थेच्या ऑडिटरपदी प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांची, तसेच संस्थेच्या जनरल बॉडीवर विजयमाला पतंगराव कदम, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, नीलिमा पोळ यांनाही संधी देण्यात आली.
सावधान! साताऱ्यात समूह संसर्ग सुरू

या बैठकीत कार्याध्यक्ष म्हणून डॉ. अनिल पाटील यांची एकमताने निवड झाली, तर संस्थेच्या व्हाईस चेअरमपदी ऍड. भगीरथ शिंदे यांची निवड झाली. संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाच्या सहसचिव म्हणून प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड, माध्यमिक विभागाचे सहसचिव म्हणून आण्णासाहेब कल्याणी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नागपुरे, संस्थेचे ऑडिटर म्हणून प्राचार्य डॉ. मेनकुदळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या कार्यवाहीने शिक्षणसंस्था चालकांची उडाली घाबरगुंडी

संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य म्हणून पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, अरुण लाड, मिलिंद हरिभाऊ माने, राहुल सुभाष इंग्रोळे, सुभाषलाल गांधी, अरविंद रामभाऊ तुपे, विनय गोपीकिसन पाटील, ऍड. के. एस. खामकर, श्रीमती विजयमाला कदम, सदाशिवराव पाटील, अमोल हणमंतराव पाटील, डॉ. प्रदीप गोविंदराव शिंदे, नीलिमा सुनील पोळ यांची एकमताने निवड करण्यात आली. याशिवाय संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे निमंत्रित सदस्य म्हणून जयसिंगराव आनंदराव ऊर्फ राजेंद्र फाळके, आबासाहेब देशमुख, चंद्रकांत दळवी, ऍड. दिलावरसाहेब मुल्ला यांची एकमताने निवड करण्यात आली. 

Edited By : Siddharth Latkar

डोळ्यात तेल घालून राखण केलेल्यांचे अश्रू ओघळले, नेमके काय झाले डिस्कळमध्ये वाचा

Video : काय सांगता...बायकोसाठी नवऱ्याने दिली बारावीची परीक्षा अन् दोघांना मिळाले सेम टू सेम मार्क

रयतच्या निवडी : उत्तर विभाग काळेंकडे, रोहित पवारांची एंट्री... एक्‍झिक्‍युटिव्हवर कराळे; मॅनेजिंगवर राजेंद्र फाळके व बोठे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rayat Shikshan Sanstha Managing Council Meeting :