नेरचे पाणी सोडा, अन्यथा रास्ता रोको करू; प्रदीप विधातेंचा इशारा

‘पावसाच्या पाण्याने व जिहे- कठापूर योजनेच्या पाण्याने नेर तलाव १०० टक्के भरला
Release water of Ner in yerala river pradip vidhate protest satara
Release water of Ner in yerala river pradip vidhate protest satarasakal
Updated on

विसापूर : नेर (ता. खटाव) येथील तलावात सरासरी ७० ते ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. कृष्णा सिंचन विभागाने नेर तलावाचे पाणी येत्या तीन दिवसात येरळा नदीत सोडले नाही, तर खटावच्या कार्यालयावर २१ जूनला धडक मोर्चा व खटाव येथे पुसेगाव-वडूज रत्यावर रास्ता रोको केला जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी दिला. श्री. विधाते म्हणाले,‘‘ पावसाच्या पाण्याने व जिहे- कठापूर योजनेच्या पाण्याने नेर तलाव १०० टक्के भरला होता. कृष्णा सिंचन विभागाने रब्बी हंगामात सोडण्याचे कष्ट घेतले नाहीत. संबधित विभागाच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रब्बी हंगाम झाल्यानंतर संबंधितांनी एप्रिल महिन्यात पाणी सोडले होते, तेही पुरेसे सोडले नव्हते. सध्या नेर तलावात ७० ते ८० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.

यावर्षीच्या उन्हाळ्यात मान्सूनपूर्व पावसाने दडी मारल्यामुळे येरळानदी पूर्णतः कोरडी पडली आहे. परिणामी येरळा नदी काठी असणाऱ्या नेर, पुसेगाव, काटकरवाडी, खातगुण, भांडेवाडी, खटाव, भुरकवडी, कुरोली, नागाचे कुमठे यासह अनेक गावच्या सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनांना पाणी पुरेसे मिळत नाही. सध्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. पाण्याअभावी शेतकऱ्यांची ऊस, आले आदी नगदी व बागायती पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र आहे.’’

मान्सून सुरू झाल्यानंतर पावसाचे व जिहे- कठापूर योजना कार्यान्वित झाल्याने त्याचेही पाणी नेर तलावात पडणार आहे. सध्या नेर तलावात मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे कृष्णासिंचन विभागाने २० जूनअखेर नेर तलावाचे पाणी येरळा नदीला सोडण्यासंदर्भात तातडीने नियोजन करावे. अन्यथा २१ जून रोजी कृष्णासिंचन विभागाच्या खटाव कार्यालयावर धडक मोर्चा व वडूज - पुसेगाव रस्त्यावर रास्ता रोको केला जाणार आहे. या आंदोलनात अनेक गावचे सरपंच, उपसरपंच व शेतकरी उपस्थित राहणार आहेत.

कामचुकार अधिकाऱ्यांची चौकशी करा

येरळा नदीलगतच्या पाणीपुरवठा योजना व शेतकरी कृष्णा सिंचन विभागाकडे पाणी सोडण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी करीत आहेत. परंतु, संबधित अधिकारी ग्रामपंचायत व शेतकऱ्यांचे पैसे भरून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी श्री. प्रदीप विधाते यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Satara Highway weekend traffic
Greater Flamingo sighting
Koyna Dam reservoir live storage report July 2026
Koyana Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com