

कऱ्हाड: दावोस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी केली आहे. दावोससोबत खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार झाले असतील, तर राज्यासाठी आनंदाची बाब आहे. मात्र, त्याच्या मागील सामंजस्य करारावर श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.