
आसू : अवकाळी पाऊस महाराष्ट्रभर झाला आहे. जिल्ह्यातील फलटण, माण, खटाव तालुक्यांत पावसाचे प्रमाण अधिक राहिले. विशेषत: फलटण तालुक्यात सरासरी पर्जन्यमानापेक्षा अधिक पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. या नुकसानीचे ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले असून, उर्वरित पंचनामे दोन- तीन दिवसांत पूर्ण होतील. राज्यातील एकूण पंचनामे विभाग स्तरावर मिळताच, ‘राष्ट्रीय आपत्ती’च्या निकषानुसार जी देय रक्कम आहे, ती संबंधित नुकसानग्रस्तांना तातडीने देण्यासाठी शासन वचनबद्ध आहे, अशी ग्वाही मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी आज दिली.