-हेमंत पवार
कऱ्हाड: मजुरांच्या हाताला काम मिळावे, यासाठी सरकारने १०० दिवस हाताला काम देणारी रोजगार हमी योजना सुरू केली. केंद्र सरकारकडून १०० दिवसांच्या कामांची मजुरी देण्यात येते. त्यापुढील दिवसांची मजुरी ही राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येते. या योजनेत सरकारने वैयक्तिक लाभाच्याही योजनांचा समावेश केला आहे. त्यामुळे त्याला मोठा प्रतिसाद मिळू लागला आहे. शेतकरी, मजुरांनी मोठ्या उमेदीने कामे केली.