

Water Ban Remains in Satara While Neighboring Districts Get Relief
sakal
-जयंत पाटील
कोपर्डे हवेली : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर पाणी उपसाबंदी आदेशाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असताना सातारा जिल्ह्यात ही बंदी कायम ठेवण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील सरपंच दत्तात्रय चव्हाण यांनी या निर्णयाबाबत शासनाकडे समान न्यायाची मागणी केली आहे.