कृषी कायदे रद्द केल्याने कऱ्हाडला बळीराजाकडुन साखर वाटप | satara | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कृषी कायदे रद्द केल्याने कऱ्हाडला बळीराजाकडुन साखर वाटप

सातारा : कृषी कायदे रद्द केल्याने कऱ्हाडला बळीराजाकडुन साखर वाटप

कऱ्हाड : नवीन तीन कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्याचा आनंदोत्सव बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने आज शुक्रवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथील दत्त चौकात साजरा केला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने साखर वाटप करण्यात आले.

नवीन कृषी कायद्याविरोधात देशाच्या विविध भागात आंदोलने झाली. त्याचबरोबर दिल्लीच्या सिमेवर गेले अनेक महिने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु होते. हे कायदे लागू झाल्यानंतर दिल्लीच्या सीमेवर व पंजाब, हरयाणा मध्ये आंदोलन सुरु झाले. ते आतपर्यंत सुरु होते. या आंदोलनात हिंसाचार झाला. अनेक शेतकऱ्यांचे मृत्यूही झाले.

हेही वाचा: राज्यांमधील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे हे कायदे मागे : संजय राऊत

अखेर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले. दरम्यान मोदी यांनी आज देशाला उद्देशून भाषण केले. सर्व शेतकरी जे एक वर्ष लढले, लाठीमार खाल्ला, खलिस्तानी, दहशतवादी आरोप झाला. मोठा संदेश गेला आणि देश एकत्र आला तर कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो, असे सांगत मोदी यांनी हे तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली.

त्याचा आनंद आज बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, तात्या पाटील, उत्तमराव खबाले, आनंदराव थोरात, पांडुरंग जगताप, मनोज हुबाले, संपत जगताप, सैफ मुल्ला व शेतकऱ्यांनी दत्त चौकात साखर वाटुन साजरा केला.

loading image
go to top