

Lives at Risk in Ambenali Ghat; Slow Infrastructure Work Under Scrutiny
sakal
सातारा/महाबळेश्वर: साताऱ्याला कोकणाशी जोडणारा महत्त्वाचा आणि वाहतुकीसाठी प्रचंड अवघड ठरणाऱ्या आंबेनळी घाटातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वीच या घाटातील भीषण अपघातात आठ तरुणांनी जीव गमावल्याच्या थरारक दुर्घटनेनंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (MSIDC) याकडे दुर्लक्ष केल्याची गंभीर स्थिती प्रवाशांना अनुभवयास मिळत आहे.