esakal | साताऱ्यात 166 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह; 3 बाधितांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

साताऱ्यात 166 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह; 3 बाधितांचा मृत्यू

जिल्ह्यात 166 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

साताऱ्यात 166 जणांचे अहवाल पाॅझिटीव्ह; 3 बाधितांचा मृत्यू

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : जिल्ह्यात शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 166 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये सातारा तालुक्यातील सातारा 3, रविवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, यादोगोपाळ पेठ 2, शाहूपुरी 1, शाहूनगर 2, रामाचागोट 3, करंजे 2, देगांव 1, गोडोली 2, संभाजीनगर 1, आर्वी 2, नागठाणे 3, मोरेवाडी 1, किडगांव 1, सासपाडे 1, कळंभे 1,सायगांव 1, कराड तालुक्यातील  कराड 4, शुक्रवार पेठ 1, मलकापूर 1, उंब्रज 3, सुरली 1, वारुंजी 1, रुक्मीणीनगर 1, ओगलेवाडी 1, मसूर 1, किवळ 1, कलवडे 2, विद्यानगर 3, रेठरे बु. 2, कार्वेनाका 1, सैदापूर 1, आगाशीवनगर 1, चचेगांव 1, पाटण तालुक्यातील पाटण 1, बनपुरी 1, डेरवण 1, शिबेवाडी 1, ऐनाचीवाडी 1, फलटण तालुक्यातील लक्ष्मीनगर 2, गारपीरवाडी 1, राजुरी 5, अंदरुड 2, मुरुम 1, साखरवाडी 4, हिंगणगाव 1, कोळकी 2, तडवळे 1, धुळदेव 2, खटाव तालुक्यातील खटाव 2, कातरखटाव 3, वडूज 8, दातेवाडी 1, डांभेवाडी 2, जाखणगाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, पुसेगांव 1, म्हासुर्णे 3, वांझोळी 2, बोंबाळे 1, बुध 1, माण  तालुक्यातील राणंद 2, गोंदवले खु. 2, म्हसवड 4, देवपूर 1, मार्डी 1, पळशी 2, दहिवडी 2, बिजवडी 2, लोधवडे 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 3. 

दुसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज; कऱ्हाडात उपाययोजनांची पूर्वतयारी सुरू

तसेच रहिमतपूर 6, वाठार कि. 1, सुरले 1, भादळे 1, खेड 1, कुमठे 1, एकसळ 1, वाठार स्टे. 1, एकंबे 1, ब्रम्हपुरी 1, जावली तालुक्यातील सांगवी 4, वाई तालुक्यातील वाई 2, उडतरे 1, रविवार पेठ 1, सह्याद्रीनगर 1, भुईंज 1, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, शिरवळ 2, लोणंद 3, नायगांव 1, भादे 1, महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 3, इतर पिपलवाडी 2 यांचा समावेश आहे. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  खटाव येथील 55 वर्षीय पुरुष व विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बिदाल (ता. माण) येथील 83 वर्षीय पुरष, बुधव (ता. खटाव) येथील 85 वर्षीय पुरुष, अशा एकूण  3 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

एकूण नमुने - 233425
एकूण बाधित - 49732  
घरी सोडण्यात आलेले - 47053  
मृत्यू - 1681 
उपचारार्थ रुग्ण - 998

loading image
go to top