केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या अधिवेशनातील भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे.
सातारा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करून त्यांचा सक्तीने राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व फुले- शाहू- आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला, तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर करण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.